agriculture news in marathi, Bangladesh highest importer of cotton from India | Agrowon

भारतीय कापसाची सर्वाधिक आयात बांगलादेशकडून
टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 एप्रिल 2018

जळगाव : भारतीय कापसाचा (गाठी) मोठा खरेदीदार म्हणून छोटासा बांगलादेश पुढे आला आहे. तेथे भारतातून आतापर्यंत सुमारे २१ लाख गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) निर्यात झाली असून, भारतीय कापसाचा मोठा आयातदार म्हणून बांगलादेशने जागा घेतली आहे. याच वेळी चीनच्या तुलनेत भारतातून अधिक कापूस आयात करणारा देश म्हणूनही बांगलादेश समोर आल्याची माहिती जाणकार व सूत निर्यातदारांनी दिली आहे.

जळगाव : भारतीय कापसाचा (गाठी) मोठा खरेदीदार म्हणून छोटासा बांगलादेश पुढे आला आहे. तेथे भारतातून आतापर्यंत सुमारे २१ लाख गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) निर्यात झाली असून, भारतीय कापसाचा मोठा आयातदार म्हणून बांगलादेशने जागा घेतली आहे. याच वेळी चीनच्या तुलनेत भारतातून अधिक कापूस आयात करणारा देश म्हणूनही बांगलादेश समोर आल्याची माहिती जाणकार व सूत निर्यातदारांनी दिली आहे.

पूर्वी चीन भारतातून कापसाची दरवर्षी सुमारे १७ ते १८ लाख गाठींची आयात करायचा. परंतु, मागील दोन वर्षे चीनने सूत आयातीवर भर देत रुई किंवा कापसाची आयात कमी केली आहे. चीनमध्ये दोन हंगामांत सुमारे १९ लाख गाठींची निर्यात भारतातून झाली. तर बांगलादेशने दोन हंगामात सुमारे ३६ लाख गाठींची आयात केली. बांगलादेशला निर्यातीवर निर्बंध नाहीत. जहाजाने कलकत्ता व इतर बंदरावरून बांगलादेशातील चिटगाव येथे कापूस पाठविला जातो. तर कलकत्ताजवळील बेनपोल येथून रस्त्याच्या मार्गाने कापसाची वाहतूक बांगलादेशात होत आहे. बांगलादेशला भारत जवळ असल्याने वाहतुकीवर खर्चही कमी होत असल्याचे सांगण्यात आले.

कापूस उत्पादन नाममात्र
बांगलादेशात कापसाचे सुमारे आठ लाख गाठींचेही उत्पादन दरवर्षी होत नाही. जगातील कापूस उत्पादनासंबंधीच्या मुद्यावर बांगलादेशला गृहीतही धरले जात नाही. असे असले तरी बांगलादेशची कापूस उत्पादकता भारतापेक्षा अधिक म्हणजेच हेक्‍टरी ६५० किलो रुईपर्यंत आहे. आपल्या सूतगिरण्यांना लागणाऱ्या ९० टक्के रुईची आयात बांगलादेशला करावी लागते. त्यासाठी बांदलादेश अलीकडे भारताला पसंती देऊ लागला आहे, अशी माहिती खानदेश जीन प्रेस कारखानदार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरविंद जैन यांनी दिली.

३५ टक्के परकीय गुंतवणूक
बांगलादेशात सुमारे ८५ सूतगिरण्या आहेत. पॉवरलूममधील गारमेंट व प्रोसेसिंग उद्योग तेथे अधिक आहे. भारतातील भिवंडी व मालेगावसारखे पॉवरलूमचे क्षेत्र बांगलादेशातील ढाका, नारायणगंज आदी भागात आहेत. तेथील कापड व सूतगिरण्या या वस्त्रोद्योगात सुमारे ३५ टक्के परकीय गुंतवणूक आहे. कारण आयात व निर्यातीसंबंधी शुल्क लागत नाही. तसेच गरीब देश म्हणून बांगलादेशचा कापड युरोपीयन युनियन व अमेरिकेतून खरेदी केले जाते. चीनने बांगलादेशातील वस्त्रोद्योगात मोठी गुंतवणूक केली आहे. यासोबत भारतीय कापड उद्योजकही बांगलादेशात आपला व्यवसाय चालवू लागले आहेत. प्रदूषणाच्या मुद्यापासूनही तेथील पॉवरलूमचे क्षेत्र दूर आहे. यामुळे बांगलादेशात वस्त्रोद्योग सर्वाधिक रोजगार उपलब्ध करणारे क्षेत्र म्हणूनही समोर आल्याची माहिती मिळाली. सध्या अमेरिका व चीनचे व्यापार युद्ध सुरू असले तरी अमेरिकेतून बांगलादेशातील चीनची मोठी गुंतवणूक असलेल्या वस्त्रोद्योगाला रुईचा पुरवठा सुरू आहे. अमेरिकेतूनही दरवर्षी बांगलादेश सुमारे २५ ते २८ लाख गाठींची आयात करतो. बांगलादेश व भारतीय वस्त्रोद्योगातील आयात निर्यात, व्यापारविषयक संबंध व इतर बाबी लक्षात घेता भारताने बांगलादेशात पश्‍चिम बंगालमधून रेल्वेचे जाळेही तयार करायला सुरवात केल्याचा दावा जाणकारांनी केला आहे.

पाकिस्तानच्या तुलनेत मजबूत टाका
वस्त्रोद्योगामुळे बांगलादेशाला रोजगार जसा मिळाला, तसा तेथील अर्थव्यवस्थेलाही मोठा आधार असून, पाकिस्तानच्या तुलनेत बांगलादेशी अर्थव्यवस्था मजबूत आहे. पाकिस्तानमध्येही रुपया हे चलन आहे. सध्या पाकिस्तानला एक यूएस डॉलर १०५ रुपयांना पडतो. तर बांगलादेशचे चलन टाका असून, त्यांना एक डॉलर सुमारे ८५ पैशांना पडतो. भारताला एक डॉलर सध्या ६५.३१ पैशांना मिळत आहे. अर्थातच पाकिस्तानच्या तुलनेत बांगलादेशची अर्थव्यवस्था मजबूत असल्याची माहिती लोणखेडा (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीचे कार्यकारी संचालक राजाराम दुल्लभ पाटील यांनी दिली.

बांगलादेशला भारतातून झालेली कापूस निर्यात
(एक गाठ १७० किलो रुई)

२०१५-१६ २०१६-१७ २०१७-१८ (एप्रिलपर्यंत)
१६ लाख गाठी १८ लाख गाठी २१ लाख गाठी (वाढ शक्‍य)
भारतातून या हंगामातील अपेक्षित निर्यात सुमारे ६५ ते ६७ लाख गाठी
बांगलादेशच्या वस्त्रोद्योगातील दर हंगामातील गरज ६५ ते ६७ लाख गाठी

प्रमुख आशियाई देशांचे सूत उत्पादन
(उत्पादन मेट्रिक टनमध्ये)

भारत ७.६ दशलक्ष
चीन ५.८ दशलक्ष
बांगलादेश १.५ दशलक्ष

बांगलादेश आपल्याकडून कापूस किंवा रुईची आयात करतो. तेथे रुईपासून सूत व नंतर कापडनिर्मिती चीन, भारताच्या तुलनेत स्वस्त पडते. वीजही तेथे भारताच्या तुलनेत स्वस्त दरात वस्त्रोद्योगाला मिळते. ड्युटी फ्री असे धोरण भारताने बांगलादेशबाबात स्वीकारल्याने बांगलादेशचे तयार कपडे (गारमेंट) अधिक प्रमाणात भारतीय बाजारात येतात. कापूस उत्पादनात बांगलादेश गृहीतही धरला जात नाही, परंतु वस्त्रोद्योगासंबंधी बांगलादेश एका दशकात पुढे गेला आहे. भारतीय उद्योजकांनी तेथे मोठी गुंतवणूक मागील पाच- सहा वर्षांत केली आहे. तेथील वस्त्रोद्योगाची आम्ही उत्सुकतेपोटी पाहणी मागील वर्षी केली आहे.
- दीपकभाई पाटील, अध्यक्ष,
लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी,
लोणखेडा (ता. शहादा, जि. नंदुरबार) 

इतर अॅग्रोमनी
कापसाच्या किमतीत आणखी सुधारणानिवडणुकीमुळे पुढील दोन महिने बहुतेक पिकांच्या...
जळगाव जिल्ह्यात हरभरा खरेदीसंबंधी तयारी...जळगाव ः जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसंबंधीची...
सेंद्रिय उत्पादनातून आठ वर्षात तीन...आधी शिक्षण, बहुराष्ट्रीय बॅंकेतील नोकरी यामुळे...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
कापसाच्या निर्यात मागणीत वाढीची शक्यताया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व...
कापूस, हळद, हरभऱ्याच्या भावात वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका,...
बांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...
भारतातील पाच कडधान्यांच्या हमीभावावर...वॉशिंग्टन : भारतात पाच कडधान्यांना दिल्या...
भारतीय चवीच्या चॉकलेटची वाढती बाजारपेठकार्तिकेयन पलानीसामी आणि हरीश मनोज कुमार या दोघा...
सुधारित पट्टापेर पद्धतीने वाढले एकरी ३१...पारंपरिक पद्धतीने सोयाबीन तूर हे आंतरपीक अनेक...
चीन, अमेरिकेचे कापूस उत्पादन पुढील...जळगाव : देशात ३१ जानेवारीअखेर सुमारे १८० लाख...
कापूस, गवार बी आणि हरभऱ्याचे भाववाढीचे...या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने साखर वगळता...
हरभरा निर्यात, स्थानिक मागणीत वाढ या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका व गहू...
सीताफळाच्या मूल्यवर्धनातून घेतला...`उद्योगाच्या घरी, रिद्धीसिद्धी पाणी भरी`, अशी...
कापसाच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता...
हलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची...नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
कृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
हरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...