agriculture news in marathi, bangladesh imposes 55 rupees import duty on indian pomogranate | Agrowon

बांगलादेशाकडून डाळिंबावर कर; प्रतिकिलोला द्यावे लागतात ५५ रुपये
अभिजित डाके
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

सांगली : बांगलादेशने डाळिंबावर प्रतिकिलोस ५५ रुपये इतकी आयात कराची वाढ केली आहे. बांगलादेशाने वाढवलेले आयात कर कमी करण्यासाठी केंद्र सरकार कोणत्याच हालचाली करताना दिसत नाहीत. यामुळे त्यामुळे भारतातील डाळिंबाची निर्यात कमी होण्याची भीती डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्यात निर्माण झाली आहे. आयात कर हा शेतकऱ्यांच्या खिशातून जात असल्याने डाळिंब उत्पादकांचे कंबरडे मोडले जाणार आहे.

सांगली : बांगलादेशने डाळिंबावर प्रतिकिलोस ५५ रुपये इतकी आयात कराची वाढ केली आहे. बांगलादेशाने वाढवलेले आयात कर कमी करण्यासाठी केंद्र सरकार कोणत्याच हालचाली करताना दिसत नाहीत. यामुळे त्यामुळे भारतातील डाळिंबाची निर्यात कमी होण्याची भीती डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्यात निर्माण झाली आहे. आयात कर हा शेतकऱ्यांच्या खिशातून जात असल्याने डाळिंब उत्पादकांचे कंबरडे मोडले जाणार आहे.

भारतालगत असणाऱ्या बांगलादेशात डाळिंबाची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. आज मितीस एकूण परदेशांत जाणाऱ्या डाळिंबापैकी केवळ अंदाजे ३० टक्के डाळिंबाची निर्यात फक्त बांगलादेशात होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी बांगलादेश डाळिंबाला प्रतिकिलोस ३० रुपये असा आयात कर आकारात होता. मात्र, गेल्या वर्षभरापासून आयात करात तब्बल २५ रुपये प्रतिकिलो वाढ केली आहे. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. आयात कर वाढविल्याने डाळिंबाचे दर कमी झाले आहेत. राज्य सरकार व केंद्र सरकाने आयात कर कमी करण्यासाठी लक्ष घालावे, अशी मागणी डाळिंब उत्पादक शेतकरी करत आहेत.

आयात कर वाढल्याने डाळिंबाचे दर घसरले
बांगलादेशाने आयात करामध्ये वाढ केली. त्याचा परिणाम डाळिंबाच्या दरावर झाला आहे. गेल्या वर्षी सरासरी २०० ते २१५ रुपये असणारा दर आज १०० ते ११५ रुपये इतका मिळू लागला आहे. परंतु अजूनही दर घसरण्याची भीती डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांतून होते आहे. यामुळे आर्थिक गणिते कशी जुळवायची असा प्रश्‍न डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.
....
प्रतिक्रिया
बांगलादेशने डाळिंबावर वाढवलेला आयात कर कमी करण्यासाठी केंद्र शासनाने व व्यापार मंत्रालयाने पुढाकार घेतला पाहिजे. तरच भारतातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना याचा अधिक फायदा होईल.
- प्रभाकर चांदणे,
अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ.

बांगलादेशने आयात कर वाढविल्याने डाळिंब निर्यात कमी होण्याची भीती आहे. आयात कर कमी करण्यासाठी सरकारने बांग्लादेशावर दबाव टाकला पाहिजे.
- आनंदराव पाटील,
सांगली, जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघ 

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...