उभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची आत्महत्या

उभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची आत्महत्या
उभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची आत्महत्या

वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे विद्यमान संचालक व शेतकरी वसंत सोपाना पवार (वय ४८, रा. बेलवाडी) यांनी पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी मिळत नसून पिके जळत असल्यामुळे विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. पवार यांनी आत्महत्येपूर्वी दोन चिठ्या लिहून ठेवल्या असून, आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली अाहे. यामध्ये जलसंपदाचे राज्यमंत्री विजय शिवतारे व पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावांचा समावेश आहे.  वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत पवार यांचे लासुर्णेमध्ये हार्डवेअर व शेतीच्या औषधे व खतांचे दुकान आहे. तसेच त्याची लासुर्णे व बेलवाडी परिसरामध्ये शेती आहे. शनिवार (ता. २१) रोजी ते दुकान बंद केल्यानंतर घरी गेलेच नव्हते. घरातील नागरिकांनी रात्रभर शोध घेतला मात्र ते आढळून आले नाहीत. रविवारी (ता.२२) सकाळी त्यांचा मृतदेह बेलवाडी गावच्या हद्दीतील जामदारवस्तीजवळील विहिरीमध्ये पाण्यावरती तरंगत असल्याचा दिसून आला. पोलिसांनी तातडीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्यांच्या खिशामध्ये दोन चिठ्ठ्या आढळल्या आहेत. यामध्ये गेल्या दोन वर्षापासून उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी कालव्याचे पाणी मिळाले नसल्यामुळे पिके जळाली आहेत. कर्जबाजारी झाल्यामुळे आर्थिक अडचणीमध्ये आल्यामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. जलसंपदा विभागाच्या विस्कळीत कारभारामुळे गतवर्षी लासुर्णे, बेलवाडी परिसरातील शेतकऱ्यांना नीरा डाव्या कालव्यातून उन्हाळी पाण्याचे आवर्तन मिळाले नव्हते. यामुळे या परिसरातील सात हजार एकरातील पिके जळून खाक झाली होती. यावर्षीही विलंब होत आहे. वसंत पवार यांच्यासह या परिसरातील शेतकऱ्यांनी १३ एप्रिल रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. मात्र पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी ४२ व ४३ क्रंमाकाच्या वितरिकेला १७ व १९ एप्रिल रोजी पाणी सोडण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र अधिकाऱ्यांनी पाणी सोडले नसल्यामुळे पिके जळण्यास सुरवात झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com