agriculture news in marathi, bank officers meeting, mumbai, maharashtra | Agrowon

पीककर्ज वाटप करताना बॅंकांनी संवेदनशीलता दाखवावी ः मुख्यमंत्री
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 जून 2018

मुंबई  : शेतकऱ्यांना पीककर्ज देणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, याचे भान ठेऊन बँकांनी काम करावे. पीककर्ज वाटप करताना संवेदनशीलता दाखवावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात बुधवारी (ता. २७) विविध बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या वेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील हायब्रीड ॲन्युईटी रस्त्यांच्या कामांबाबत आढावा घेऊन बँकांच्या समस्यांचे निराकरण केले.

मुंबई  : शेतकऱ्यांना पीककर्ज देणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, याचे भान ठेऊन बँकांनी काम करावे. पीककर्ज वाटप करताना संवेदनशीलता दाखवावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात बुधवारी (ता. २७) विविध बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या वेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील हायब्रीड ॲन्युईटी रस्त्यांच्या कामांबाबत आढावा घेऊन बँकांच्या समस्यांचे निराकरण केले.

बैठकीस सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, रोजगार हमी योजनामंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष रजनीश कुमार आदी या वेळी उपस्थित होते.

या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की राज्यात खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या सुरू झाल्या असून, शेतकऱ्यांना बियाणे, खते खरेदी करण्यासाठी अर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप वेळेत झाले पाहिजे. मात्र, बऱ्याच ठिकाणी स्थानिक बँक शाखांकडून या संदर्भात असंवेदनशीलता दाखविली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा बँकांवर रोष दिसून येत आहे. त्यामुळे तातडीने सर्व बँकांच्या स्थानिक शाखांपर्यंत पीककर्ज वितरणाबाबत संदेश देण्यात यावेत.

गेल्या महिन्यात झालेल्या राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीमध्ये पीककर्ज देण्यासंदर्भात जो निर्णय झाला आहे, त्याचे पालन सर्वच बँकांनी करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना पीककर्ज देणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे याचे भान ठेवून बँकांच्या स्थानिक शाखांनी काम करावे, असे स्पष्ट करीत पेरणीसाठी शेतकऱ्यांना तातडीने कर्जपुरवठा करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या वेळी बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्‍यांना दिले.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...