बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात प्रवेश बंदी

बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात प्रवेश बंदी
बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात प्रवेश बंदी

अकोला ः शेतकरी संघटनेच्या महिला अाघाडीचा मेेळावा अकोट तालुक्यातील चोरवड बुद्रुक येथे झाला असून, कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारात येणाऱ्या अधिकाऱ्यांना गावात प्रवेश बंदी करणार असल्याचा इशारा या वेळी देण्यात अाला.

शासन कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना देऊ शकले नाही. अकोट आणि तेल्हारा या दोन तालुक्यातील असंख्य शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. पण खासगी व सरकारी बँकांचे कर्मचारी शेतकऱ्यांना वसुलीसाठी तगादा लावत आहेत. दोन्ही तालुक्यामध्ये या वर्षी दुष्काळ आहे. तरीसुद्धा वसुलीसाठी अधिकारी येत असून याचा सर्वात जास्त त्रास हा घरी असलेल्या महिलांना सहन करावा लागतो. त्यामुळे यापुढे गावात वसुली अधिकाऱ्यांना बंदी घालण्याचा संकल्प मेळाव्यात महिला शेतकऱ्यांनी केला. अधिकाऱ्यांना इशारा म्हणून गावाच्या वेशीवरच शेतकरी संघटनेचा फलक लावण्यात आला आहे. 

या मेळाव्याला मार्गदर्शक म्हणून शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते ललित बहाळे, शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा अध्यक्ष सतीश देशमुख, तेल्हारा तालुका प्रमुख लक्ष्मीकांत कौठकार उपस्थित होते. या वेळी विदर्भ महिला आघाडीच्या जोत्स्ना बहाळे यांनी अकोट महिला आघाडी या पदावर प्रमिला राम भारसाकळे यांची नियुक्ती जाहीर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष भारसाकळे यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com