agriculture news in marathi, banks not providing adequate information on loan waive, maharashtra | Agrowon

कर्जमाफीची माहिती देण्यात बँका उदासीन
मारुती कंदले
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

बँकांकडून शेतकऱ्यांच्या कर्जाबद्दलची सविस्तर आणि अचूक माहिती आल्याशिवाय पुढील प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही. यामुळे दिवाळीपर्यंत कर्ज वर्ग करण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात अशी भीती व्यक्त होत आहे.

मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीची माहिती देण्यात बँकांची उदासीनता दिसून येत आहे. ही प्रक्रिया सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकमेव अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या कर्जाबद्दलची अचूक आणि योग्य माहिती सहकार खात्याला सादर केली आहे.

शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या एकंदर ८९ बँकांकडून सहकार खात्याने ही माहिती मागवली असून नऊ बँकांनी पुरवलेली माहिती पुरेशी नसून सदोष आढळल्याचे सहकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. या संथगतीमुळे कर्जमाफीची प्रक्रिया रेंगाळण्याची चिन्हे आहेत.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सहकार खात्याने शेतकऱ्यांच्या ऑनलाइन अर्जासोबतच बँकांकडून माहिती मागवण्यात आली आहे. एक महिना होऊन वाढीव आठ दिवसांची मुदत शुक्रवारी संपत असताना अजूनही बँकांच्या पातळीवर उदासीनता असल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जाची खात्री करण्यासाठी सहकार विभागाने बँकांना ६६ रकान्याचा अर्ज भरुन घेतला जात आहे. मात्र, आतापर्यंत एकमेव अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या कर्जासंदर्भातील अचूक आणि पुरेशी माहिती सहकार खात्यापुढे सादर केली आहे.

६६ रकान्यांचा अर्ज भरण्यात विलंब
राज्यातील सर्व ३१ जिल्हा बँकांसह सार्वजनिक क्षेत्रातील एकंदरीत ८९ बँकांकडून सहकार खात्याने शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती मागवली आहे. त्यापैकी अकोला बँक सोडून इतर नऊ बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती पुरवली आहे. मात्र, ही माहितीसुद्धा सदोष असल्याचे सहकारमधील सूत्रांनी स्पष्ट केले. हा ६६ रकान्यांचा अर्ज भरण्यात बँकांना विलंब लागत असल्याचे सांगितले जात आहे.

एका शेतकऱ्याचा फॉर्म भरण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे वेळ लागत असल्याचे बँकांचे अधिकारी सांगत आहेत. मात्र, कर्जमाफीची रक्कम बँकांनाच मिळणार असल्याने बँकांनी याकामी स्वतंत्र यंत्रणा लावणे अपेक्षित असल्याचे सहकार खात्यातून सांगण्यात येत आहे. त्यामुळे बँकांचे हे स्पष्टीकरण हास्यास्पद असल्याचे सांगितले जात आहे. बँकांकडून शेतकऱ्यांच्या कर्जाबद्दलची सविस्तर आणि अचूक माहिती आल्याशिवाय पुढील प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही. यामुळे दिवाळीपर्यंत कर्ज वर्ग करण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात अशी भीती व्यक्त होत आहे.

इतर अॅग्रो विशेष
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
पडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...
चारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
ढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...
ब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...