बॅंकांनी खरीप कर्जाची उद्दिष्टपूर्ती करावीः चंद्रशेखर बावनकुळे

बॅंकांनी खरीप कर्जाची उद्दिष्टपूर्ती करावीः चंद्रशेखर बावनकुळे
बॅंकांनी खरीप कर्जाची उद्दिष्टपूर्ती करावीः चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर ः शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीला प्रोत्साहन देण्यासाठी बॅंकांनी आवश्‍यकतेनुसार आणि वेळेवर कर्ज उपलब्ध करावे त्याकरिता गावनिहाय कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.  बचत भवन सभागृहात खरीप हंगामातील कर्जवाटप, तसेच कर्जमाफीसंदर्भात विविध राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी मार्गदर्शन करताना श्री. बावनकुळे बोलत होते. या वेळी अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक बारापात्रे उपस्थित होते. खरीप हंगामासाठी विविध बॅंकांना ९७९ कोटी ९५ लाख रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्‍यक असलेले बियाणे, खते, तसेच मशागतीसाठी कर्जाची आवश्‍यकता असल्यामुळे प्रत्येक गावात राष्ट्रीयीकृत बॅंकांनी शाखानिहाय कर्जमेळावे आयोजित करावेत. या कर्ज मेळाव्यात उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जपुरवठा होईल, या दृष्टीने नियोजन करावे, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.   खरीप कर्जवाटपाचे मागील वर्षी केवळ ७२४ कोटी म्हणजे ६० टक्‍के उद्दिष्ट गाठण्यात आले होते. परंतु या वर्षी १०० टक्‍के उद्दिष्टपूर्तीसाठी बॅंकांनी पुढाकार घ्यवा. महसूल व सहकार विभागातर्फे बॅंकांना आवशक मदत देण्यात येईल. शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यात ७० हजार ३५६ शेतकऱ्यांचे ४३४ कोटी ५२ लक्ष रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. यामध्ये ५० हजार २९१ शेतकऱ्यांचे ३४१ कोटी ५५ लक्ष रुपयांची कर्जमाफी, ओटीएस योजनेमध्ये ५ हजार ५५७ शेतकऱ्यांना ६० कोटी ९५ लक्ष रुपये तर इन्सेन्टिव्ह योजनेमध्ये १४ हजार ३०८ शेतकऱ्यांना ३२ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. यावेळी विविध बॅंकांनी त्यांच्याव्दारे वितरीत कर्जाची माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com