जळगावात रब्बी पीककर्जासाठी बँकांचा हात आखडता

जळगावात रब्बी पीककर्जासाठी बँकांचा हात आखडता
जळगावात रब्बी पीककर्जासाठी बँकांचा हात आखडता

जळगाव : खरीप हंगामात जशी पीककर्जासाठी वणवण करावी लागली, अगदी तशीच स्थिती आताही रब्बी हंगामासंबंधी बॅंकांनी शेतकऱ्यांवर आणली आहे. रब्बी हंगाम अधिकृतपणे सुरू होऊन दोन महिने होत आले तरी रब्बीच्या पीक कर्जवाटपाचा टक्का फारसा वधारलेला नाही. शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत बॅंका हात आखडता घेत असल्याचे चित्र आहे.  बॅंका टाळाटाळ करीत असल्याने आजघडीला केवळ १५ टक्के कर्जाचे वितरण झाले आहे. जिल्हाभरातील सहकारी व राष्ट्रीयीकृत बॅंकांना रब्बीसाठी १४४ कोटी रुपये कर्ज देण्याचे उद्दिष्ट ठरले आहे. यातील केवळ २१ कोटी ७२ लाख कर्ज वितरण झाले आहे. अर्थातच फक्त १५ टक्के कर्ज वितरण झाले असून, यासंबंधी प्रशासनाने राष्ट्रीयीकृत व इतर बॅंकांना पत्र जारी करण्याची तयारी केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पीककर्ज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतर्फे वितरित केले जाते. यापाठोपाठ राष्ट्रीयीकृत बॅंकांचा वाटा असतो. 

मागील वर्षाच्या तुलनेत निम्मेच काम रब्बी कर्ज वितरणासंबंधी यंदा निम्मे कामही झालेले नाही. मागील वर्षी २१० कोटी रुपये पीककर्ज रब्बी हंगामासाठी वितरणाचा निर्णय झाला होता. तर यातुलनेत अधिक म्हणजेच २१७ कोटी रुपये कर्ज वितरण झाले होते. यंदा कर्ज वितरणाचे उद्दिष्ट कमी असतानाही काम गतीने सुरू नसल्याचे समोर आले आहे.  शेतकरी आर्थिक कचाट्यात मागील आर्थिक वर्षात कर्जमाफीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी नियमित पीककर्ज मार्चअखेर भरले नाही. थकबाकीदार वाढले. त्यात कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होऊन सहा महिने झाले तरी प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही. शेतकरी थकबाकीदारच दिसत आहे. त्याला बॅंका कर्ज देत नाहीत. शासनही सकारात्मक पावले उचलत नाही. दुसरीकडे यंदाचा खरीप बोंबलला आहे. तर रब्बीची सुरवात होताच वीजजोडण्या तोडण्याचे प्रकार सुरू झाले. पूर्णतः नकारात्मक वातावरणाच शेतकरी जगत असून, त्यांची पुरती आर्थिक कोंडी झाली असल्याची नाराजी शेतकरी आत्माराम बळिराम पाटील (कापडणे, जि. धुळे) यांनी व्यक्त केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com