agriculture news in marathi, Banks started lending for Kharif Season | Agrowon

पतआराखड्याची वाट न बघता खरिपासाठी कर्ज
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 मे 2019

पुणे : खरीप पीक कर्जवाटप नियोजनात मुख्य भूमिका असलेल्या राज्यस्तरीय बॅंकर्स समितीची बैठक लांबणीवर पडली असून, पतपुरवठा आराखडाही रखडला आहे. मात्र, आराखड्याची वाट न बघता बहुतेक बॅंकांनी कर्जवाटप सुरू केले आहे. 

पुणे : खरीप पीक कर्जवाटप नियोजनात मुख्य भूमिका असलेल्या राज्यस्तरीय बॅंकर्स समितीची बैठक लांबणीवर पडली असून, पतपुरवठा आराखडाही रखडला आहे. मात्र, आराखड्याची वाट न बघता बहुतेक बॅंकांनी कर्जवाटप सुरू केले आहे. 

सहकार विभागाच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खरीप व रब्‍बी कर्जवाटपाचे नियोजन केले जाते. राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या (एसएलबीसी) बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होते. आचारसंहितेमुळे समितीची बैठक झालीच नाही. मात्र, आराखड्याची वाट न पहाता जिल्हा बॅंका व राष्ट्रीयकृत बॅंकांनी कर्जवाटप सुरू केले आहे. विदर्भात अकोला व वाशीम जिल्ह्यांत खरिपासाठी दोन लाख शेतकऱ्यांना ११८३ कोटी रुपये वाटण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ४१ हजार ५२७ शेतकऱ्यांना ३३७ कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे.

‘कर्जमाफीत पात्र ठरलेले शेतकरी तसेच कर्जभरणा करून ‘नील’ झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्जपुरवठा केला जात आहे. नियमानुसार खरिपासाठी १ एप्रिलपासून ते ३० सप्टेंबरपर्यंत कर्जवाटप केले जाते. राज्यात कर्जदार शेतकरी शक्यतो १५ ऑगस्टपर्यंत सर्व रकमा उचलतात. त्यामुळे ऑगस्टअखेर कर्जवाटपाचे काम संपलेले असते,’ असे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. 

दुष्काळ व कर्जमाफीच्या गोंधळामुळे गेल्या हंगामात अमरावती भागात कर्जवाटप कमी झाले होते. ६८ हजार शेतकरी सभासद संख्या असूनही अमरावती जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने फक्त १९ हजार शेतकऱ्यांना कर्ज दिले. ‘गेल्या हंगामात १७५ कोटी रुपये कर्जवाटप झाल्यानंतर बॅंकेची वसुली मात्र १३४ कोटींच्या आसपास झालेली आहे. उर्वरित रक्कम वसुली झालेली नाही. कारण, शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा आहे. बहुतेक जिल्हा बॅंकांच्या अशा कोट्यवधीच्या रकमा वसुलीअभावी अडकून पडल्या आहेत,’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

राज्यात गेल्या खरिपात सर्व बॅंकांनी मिळून ४३ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना कर्जापोटी वाटण्याचे निश्चित केले होते. प्रत्यक्षात वाटप फक्त २२ हजार ७५४ कोटींच्या आसपास झाले. याचाच अर्थ राज्यात खरिपापोटी कर्जासाठी काढून ठेवलेली ४८ टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली गेली नाही. 

खरीप कर्जवाटप यंदादेखील जिल्हा बॅंकांवरच मदार आहे. राष्ट्रीयकृत बॅंका पीक कर्जवाटापात उदासीन असल्यामुळे गेल्या हंगामात या बॅंकांनी फक्त ४३ टक्के कर्ज वाटले. गेल्या वर्षी खरीप कर्जापोटी २७ हजार ८४९ कोटी रुपये वाटण्याचे आश्वासन राष्ट्रीयकृत बॅंकांनी राज्यस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर दिले होते. प्रत्यक्षात फक्त १२ हजार कोटी रुपये वाटले गेले. 

जिल्हा बॅंकांनी गेल्या खरिपात राज्यात १८ लाख शेतकऱ्यांना ९ हजार कोटी रुपये वाटले आहे. याउलट राष्ट्रीयकृत बॅंकांनी साडेनऊ लाख शेतकऱ्यांना १२ हजार कोटी रुपये वाटले आहेत. अनेक समस्या असूनही जिल्हा बॅंका जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज वाटतात हे यातून सिद्ध होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
 

इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफीची कूर्मगतीराज्यात दोन आठवड्याने उशिरा मॉन्सून दाखल झाला...
सोयीनुसार निवडणूक घेण्याचे ढोंग कशाला?देशापुढील वास्तव संकटे, समस्या अग्रक्रमाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
आटपाडीत पावसाने पाणीपातळीत वाढसांगली : आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागात दोन...
मराठवाड्यात सर्वदूर पावसाच्या सरीऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
नाशिक येथे बुधवारी पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक ः सातत्याने उद्भवणाऱ्या दुष्काळी स्थितीमुळे...
राज्यात चार वर्षांत १२ हजार...मुंबई  : शेतकऱ्यांना सुखी करण्याचे...
योग्य ओलाव्यावर करा पेरणी बाजरी बाजरी पिकाकरिता पाण्याचा उत्तम निचरा...
प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखअमरावती येथील जयश्री रवींद्र गुंबळे यांनी गेल्या...
ग्रामविकास, आरोग्य अन् शिक्षणासाठी ‘खोज...मेळघाट परिसरातील आदिवासी लोकांच्या विकासासाठी...
मॉन्सून मंगळवारपर्यंत संपूर्ण राज्य...पुणे  : राज्यात दाखल होताच नैर्ऋत्य मोसमी...
मराठवाडा, विदर्भातील दक्षिण भागात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने...
पाणीवापर संस्थांनी वाढवावी कार्यक्षमता सहकारी उपसा जलसिंचन योजनेच्या इतिहासाची माहिती...
पत्रास कारण की ...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व...
दुग्धव्यवसाय, प्रक्रियेने दिला शेताीला...बुलडाणा शहरापासून सुमारे दहा किलोमीटरवरील अजिसपूर...