agriculture news in marathi, Baramati Agricultural College Roll Model | Agrowon

बारामती कृषी महाविद्यालय देशात रोल मॉडेल
सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

बारामती, जि. पुणे ः येथील कृषिक प्रदर्शनासाठी उपस्थित राहिलेल्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा यांनी बारामतीचे कृषी महाविद्यालय देशातील रोल मॉडेल असल्याचे सांगत आणखी एक सुखद धक्का दिला, तो म्हणजे येथील कृषी शिक्षण पद्धतीचे सूत्र संपूर्ण देशात लागू करण्यासाठी आपण स्वतः विद्यापीठांच्या कुलगुरू परिषदेत बारामतीचे सादरीकरण करणार असल्याचे स्पष्ट केले.

बारामती, जि. पुणे ः येथील कृषिक प्रदर्शनासाठी उपस्थित राहिलेल्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा यांनी बारामतीचे कृषी महाविद्यालय देशातील रोल मॉडेल असल्याचे सांगत आणखी एक सुखद धक्का दिला, तो म्हणजे येथील कृषी शिक्षण पद्धतीचे सूत्र संपूर्ण देशात लागू करण्यासाठी आपण स्वतः विद्यापीठांच्या कुलगुरू परिषदेत बारामतीचे सादरीकरण करणार असल्याचे स्पष्ट केले.

डॉ. मोहपात्रा यांनी बारामती कृषी महाविद्यालयाला भेट दिली व तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नेदरलॅंडमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशीही त्यांनी संवाद साधल्यानंतर ते प्रभावित झाले. नेदरलॅंड व कोस्टारिकासारख्या शैक्षणिक प्रगत देशांची शिक्षणपद्धती येथे राबविली जात असल्याबद्दल त्यांनी महाविद्यालयाचे कौतुक केले. महाविद्यालयाने आजवर केलेले विविध आंतरराष्ट्रीय करार व अभ्यासक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

भारतीय शेती शिक्षणाच्या प्रगतीसाठी अशाच प्रकारची शिक्षणपद्धती सर्वत्र राबविणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. देशातील सर्व कृषी विद्यापीठांच्या कुलगुरू परिषदेत आपण स्वतः याचे सादरीकरण करू असे सांगत त्यांनी शारदानगर शैक्षणिक संकुलाचे शिक्षण संचालक नीलेश नलावडे यांना या संदर्भात तातडीने अहवाल पाठविण्याची सूचना केली. डॉ. मोहपात्रा यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्याविषयी कौतुकोद्गार काढताना त्यांच्यामुळेच अशा वेगळ्या मार्गाने जाता येईल, असे मत व्यक्त केले.

येथील गुगल क्लासरूम, सिम्युलेटर, कौशल्याधिष्ठित शिक्षण पद्धत, पशुसंवर्धानातील राक प्रकल्प, परदेशातील विद्यार्थी अभ्यासक्रम, फिल्फ क्लासरूम अशा विविध मुद्द्यांची त्यांनी थांबून माहिती घेतली.

या वेळी त्यांच्यासमवेत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे विस्तार शिक्षण उपसंचालक डॉ. ए. के. सिंग, नियामचे संचालक डॉ. एन. पी. सिंग, विभागीय संचालक डॉ. लाखनसिंग, महात्मा फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप गायकवाड आदी उपस्थित होते.  

अन् खुद्द `डीजी`साहेब भेटतात तेव्हा...
भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा यांनी जाता-जाता कृषी महाविद्यालयातील `ऋषिकेश`ला अविस्मरणीय भेट दिली... त्याच्याशी संवाद साधला आणि त्याच्या महत्त्वाकांक्षेला दादही दिली...! बारामतीच्या कृषी महाविद्यालयातील पदवीच्या प्रथम वर्षात शिकत असलेला ऋषिकेश भरत पवार याच्याशी हस्तांदोलन केले आणि त्याला कोणता विषय आवडतो आणि तुला काय व्हायचे आहे, असे दोन प्रश्न विचारले. या प्रश्नाच्या उत्तरादाखल ऋषिकेश याने प्लान्ट ब्रीडिंग विषयात असणारा रस व भविष्यात शास्त्रज्ञ बनण्याची इच्छा बोलून दाखवित शेतकऱ्यांसाठी भरीव योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच्या या ध्येयावर प्रभावित होऊन डॉ. महापात्रा यांनी त्याचे कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या.

इतर ताज्या घडामोडी
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला चैत्री...सोलापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या चैत्री...
अकोला जगात ‘हॉट’ शहरांच्या यादीतअकोला : मागील दोन दिवसांपासून या भागात उष्णतेचे...
दुष्काळी भागात दाहकता वाढलीसावळज, जि. सांगली : कायमस्वरूपी दुष्काळी भाग...
विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या :...नाशिक : लोकसभेची ही निवडणूक विकासाची, सामान्य...
राहुल गांधी यांची आज संगमनेरात सभानगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काॅँग्रेसचे...
तयार करा सेंद्रिय निविष्ठाअलीकडे सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची...
रताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...
निवडणूक संपली, आता तरी दुष्काळी...सांगली ः लोकसभेची आचारसंहिता एक महिन्यापासून सुरू...
चौथ्या टप्प्यात १०९ कोट्यधीश उमेदवार...मुंबई ः राज्यातील चौथ्या टप्प्याची निवडणूक...
पुणे ः खरिपासाठी एक लाख ८५ हजार टन...पुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू...
राज्यात कलिंगड प्रतिक्विंटल ५०० ते २१००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते ११०० रुपये अकोला ः...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...