agriculture news in marathi, Baramati jawar prices are Rs. 4 thousand per quintal | Agrowon

बारामतीत ज्वारीचे दरप्रतिक्विंटल चार हजार रुपये
टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

पुणे ः बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २५) आणि सोमवारी (ता. २९) बाजार आवारात लिलावामध्ये ज्वारीला चार हजार रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांकी दर मिळाला. गुरुवारी (ता. २५) क्विंटलला कमाल ४०१५ रुपये, किमान २ हजार ५०० रुपये एवढा, तर सरासरी तीन हजार ५०० रुपये एवढा दर मिळाला आहे. बाजार आवारात एकूण ५०६ क्विटंलची आवक झाली होती.

पुणे ः बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २५) आणि सोमवारी (ता. २९) बाजार आवारात लिलावामध्ये ज्वारीला चार हजार रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांकी दर मिळाला. गुरुवारी (ता. २५) क्विंटलला कमाल ४०१५ रुपये, किमान २ हजार ५०० रुपये एवढा, तर सरासरी तीन हजार ५०० रुपये एवढा दर मिळाला आहे. बाजार आवारात एकूण ५०६ क्विटंलची आवक झाली होती.

सोमवारी (ता. २९) ३४५ क्विंटलची आवक झाली होती. हा दर शेतकरी हनुमंत चांगण, गणेश चांगण, मधुकर सोलवणकर, गजानन चांगण, श्री. नाळे, श्री. महाडिक यांनी आणलेल्या ज्वारीस मिळाला आहे. बारामतीतील बाजार समितीत तालुक्यासह, दहीवडी, माण, पुसेगाव, इंदापूर, दौंड, फलटण, दुधवाबी, राशीन या भागातील शेतकरी ज्वारी आणून विकत असतात. सध्या पूर्व पट्ट्यातील अनेक भागात पाणीटंचाई भासत आहे. खरिपातही कमी पावसामुळे पिके वाया गेली आहेत.

शेतकरी स्वतःकडील असलेल्या शेतीमाल बाजारात विक्रीस तयार होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाजार आवारात कमी आवक असल्याने शेतीमालाचे दर मागणी व पुरवठा यानुसार मिळत असल्याने बाजारभाव तेजीत आहेत. मार्केटमध्ये बाळासाहेबर फराटे, अमोल वाडीकर, शिवाजी फाळके, केशव मचाले, वैभव शिंदे असे आडतदार असून, बाळासाहेब फराटे यांच्याकडे सर्वाधिक दर मिळाला आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.

‘सध्या पाणीटंचाई सुरू आहे. काही ठिकाणी रब्बी पेरणी सुरू आहे. त्यामुळे बाजारात कमी माल विक्रीसाठी आणत आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल स्वच्छ व ग्रेडिंग करून आणल्यास आणखी जादा दर मिळेल.’
अनिल हिवरकर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...
नगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...
सोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...
जळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
हळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...
सागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...
मधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...
बुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...
खानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....
ऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...
नाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...
गोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
परभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...
खरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात...