agriculture news in marathi, Baramati KVK will established 'Ideal Farmers Center' | Agrowon

बारामतीचे केव्हीके बनणार ‘आयडियल फार्मर्स सेंटर‘
ज्ञानेश्वर रायते
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

बारामती, जि.

बारामती, जि. पुणे ः टोमॅटोचे झाड ४० फुटांपर्यंत उंचीचे असेल...त्याचे उत्पादन नऊ महिने चालेल...तेच नव्हे तर सर्वच भाजीपाल्याची रोपेदेखील गावठी खुंट ते जगातील सर्वांत चांगल्या संकरीत जातीच्या खुंटाची कलमे केलेली असतील...एक चौरस मीटरमध्ये वीस किलो उत्पादनाऐवजी मिळेल ७० किलो उत्पादन...झाडे असतील रोगप्रतिकारक...मातीविना शेतीतील पुढचा प्रयोग आणि फळांचे आकारही अधिक मोठे असतील...भाजीपाल्यास त्या दिवशी सूर्याची उष्णता जेवढी तीव्र, तेवढ्याच पद्धतीचे पाणी दिले जाईल...ही सारी स्वप्नवत कल्पना वाटतेय; परंतु हे सारे आता शेतकऱ्यांच्या आवाक्‍यात आणलेय शारदानगरच्या ‘इंडो-डच भाजीपाला गुणवत्ता केंद्राने. यामुळे हे केंद्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आयडियल फार्मर्स सर्व्हिस सेंटर बनणार आहे.

बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रात इंडो-डच तंत्रज्ञानाचे सेंटर ऑफ एक्‍सलन्स हे भारतीय भाजीपाल्याच्या शेतीला वेगळी दिशा व तंत्रज्ञान देणारे पहिले सेंटर आहे. भाजीपाल्याच्या जाती व विविध प्रकारच्या उच्च गुणवत्तेच्या रोपांचे उत्पादन, त्याचे वितरण यात हे केंद्र मोलाची भूमिका बजावणार आहे.

शारदानगरच्या या इंडो-डच भाजीपाला गुणवत्ता केंद्रात सध्या टोमॅटो, मिरची, काकडी, रंगीत ढोबळी मिरची, स्ट्रॉबेरी अशी पिके घेतली गेली आहेत. भविष्यात मातीविना शेतीच महत्त्वाची ठरणार असल्याने तिचे महत्त्व दाखविण्यासाठी प्रत्येक भाजीपाल्याची मातीविना व मातीतील पिकांची प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. साहजिकच या दोन प्रकारच्या आधुनिक शेतीतही भाजीपाल्याच्या वाढीतील फरक, उत्पादनातील व फळांच्या आकारातील फरक व कीडरोगाच्या प्रतिबंधक क्षमतेचीही तपासणी शेतकऱ्यांना स्वतः करता येईल.

या केंद्रात उच्च तंत्रज्ञानयुक्त रोपवाटिका आहेत. टोमॅटोच्या मशाडो, लीडरटॉम, सिल्वियाना, सवान्टीस, नोवारा, केएसपी- अशा १३७ जाती, ढोबळीच्या बचाटा, बंगी, इन्सिरेशन, निमेलाइट, अल्मरांटी, ॲटलांटी अशा सर्वच भाजीपाल्याच्या प्रत्येकी एकाहून अधिक जाती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोचवून भाजीपाल्याच्या बाबत महाराष्ट्रासह इतर राज्यांतील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

प्रतिवर्षी २५ लाखांपर्यंतची भाजीपाल्याची रोपे तयार करण्याची या प्रकल्पाची क्षमता असून, यापुढील काळात त्यात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वाढ करता येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून रोपांची गुणवत्ता वाढविणे, त्यांचे आयुष्यमान वाढविणे, उत्पादनाच्या वाढीसह त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यावर भर राहणार आहे.

शेतकऱ्याला भाजीपाला लागवडीपासून ते काढणी व काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाची माहिती एकाच ठिकाणी प्रात्यक्षिकासह येथे मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

 

इतर अॅग्रो विशेष
जगभरात अवशेषमुक्त मालालाच मागणीपुणे : निर्यातीत युरोपीय देशांप्रमाणे अन्य...
पूर्णधान्य आहाराचा आरोग्यासाठी होतो...आरोग्यासाठी साध्या धान्यांच्या तुलनेमध्ये...
सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी :...नवी दिल्ली  : २०१९ मध्ये सत्तेत आल्यास...
त्रिगुणी म्हशीची विजयी पताकाजगात सर्वप्रथम हॅंड गाईडेड क्लोनिंग म्हणजे हस्त...
जाणिवेचा लॉंग मार्चशेतकरी संपामुळे सरकारला कर्जमाफीची घोषणा...
विदर्भात विस्तारतो आहे पोल्ट्री व्यवसायकडक उन्हाळ्यामुळे पोल्ट्री व्यवसाय विदर्भामध्ये...
तुरळक पावसाचा अंदाज; तापमान वाढणारपुणे : राज्यात सोमवारी (ता. १९) मध्य महाराष्ट्र,...
कृषी योजनांचा निधी खर्च करण्यात अपयशपुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांचा निधी...
शेतकरी आत्महत्यांचे सरकारला काहीच वाटत...राळेगणसिद्धी, जि. नगर : ‘‘लोकपाल आणि लोकायुक्त...
कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत व्याज माफ;...बारामती, पुणे ः "छत्रपती शिवाजी महाराज...
अवजारांची गुणवत्ता हाच बनलाय ब्रॅंडगिरणारे (जि. नाशिक) गावातील पिंकी सुधाकर पवार...
‘तेर` करतेय पर्यावरण, शिक्षण अन्‌ सौर...पुणे येथील ‘तेर पॉलिसी सेंटर` या स्वयंसेवी...
'कृषी उद्योग'मधील वादग्रस्त सूर्यगण...पुणे : महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळातील...
‘फॉस्फोनिक ॲसिड’च्या आढळाने ‘सॅंपल फेल’...पुणे : डाळिंब पिकात केवळ सातच लेबल क्लेम...
बोंड अळी, धान नुकसानग्रस्तांना मदतीसाठी...पुणे : बाेंड अळीच्या प्रादुर्भावाने नुकसान...
बेदाण्याचे यंदा तीस टक्केच उत्पादनसांगली : राज्यात दरवर्षी सुमारे २ लाख टन...
हमीभावाच्या मुद्द्यावरून गैरसमज पसरवले...नवी दिल्ली : उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक...पुणे : राज्यावर अवकाळीचे ढग असल्याने पावसाचे सावट...
आसामी रेडकाचा ‘क्लोन’ यशस्वीहिस्सार, हरियाणा : येथील केंद्रीय म्हैस संशोधन...
राज्यात १५ लाख टन साखर उत्पादन वाढलेकोल्हापूर : राज्यात सुरू हंगामात यंदा अंदाजपेक्षा...