आॅनलाइन नोंदणी अडकली नियमात

आम्हाला शेतकऱ्यांचे नुकसान करायचे नाही. पण ऑनलाइन सातबाराच सदोष निघत असल्याने आम्हीही हतबल आहोत. संगणकीकृत प्रणाली व्यवस्थित करा म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून शासनाच्या मागे लागलो आहोत. शासकीय पातळीवर याबाबत गांभीर्याने प्रयत्न झाले तरच प्रश्‍न सुटू शकतील. - लक्ष्मीकांत काजे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य तलाठी संघ
नोंदणी
नोंदणी

कोल्हापूर : हमीभाव खरेदी केंद्राबरोबरच अन्य सहकारी केंद्रांवरही शेतकऱ्यांकडून पिकाची नोंद असलेल्या सातबाऱ्याची मागणी होत आहे. परंतु संगणकीकृत उताऱ्यामध्ये अद्यापही यंदाचे पीक पाणी नोंद नसल्याने तलाठी दाखले देण्यास असमर्थ आहेत. सर्व्हर डाऊनमुळे ऑनलाइन दाखले अद्ययावत नसल्याने हा घोळ निर्माण झाला. शेतमाल विक्रीच्या नोंदणीसाठी पीक नोंदणीकृत सातबाऱ्याची सक्ती केली, मात्र सातबाराच मिळत नसल्याने नोंदणी नियमात अडकली आहे.     ऑनलाइनच्या दबावामुळे पीक पाण्याची स्वतंत्र    नोंद असलेले हस्तलिखित दाखलेही मिळणे अडचणीचे बनले आहे. यंदा खरीप काढणीच्या उत्तरार्धात अनेक ठिकाणी प्रचंड पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या काढण्या लांबल्या आहेत. जसा वाफसा येईल त्याप्रमाणे शेतकरी खरीप मळणी करीत आहेत. मळणी केल्यानंतर शेतमाल विक्रीसाठी खरेदी विक्री केंद्रात नेण्यासाठी धावपळ सुरू आहे. मात्र जर शेतकरी शेतमाल संबंधित केंद्रावर नेल्यास यंदाच्या वर्षातील नोंद असलेला  सातबारा हवा, अशी मागणी करीत शेतकऱ्यांना परत पाठविले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या संतापात भर पडल्याचे दृश्य आहे. या आहेत तलाठ्यांच्या अडचणी  संगणकीकृत सातबाऱ्यामध्ये पीक पाण्याचा कॉलम भरण्यास सॉफ्टवेअरमध्ये अडचणी येत आहेत. ऑनलाइन त्रुटी असल्याने साताबारा अपडेट केला तरी यामध्ये पीक पाण्याची नोंद होत नसल्याची तक्रार तलाठ्यांची आहे. ऑनलाइनच्या कामामुळे हस्तलिखित दाखलेही मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. या त्रांगड्यामुळे शेतकऱ्यांची शेतमालाची विक्री ही थांबली आहे. फाॅर्म नंबर अकराच्या माध्यमातून पीक पाण्याची नोंद होते. साधारणत: १५ सप्टेंबर ते १५ ऑक्‍टोंबरपर्यंत नोंद व्हायला हवी, पण कामकाज मंदावल्याने हस्तलिखित ११ नंबरचा फार्म देणेही कठीण झाल्याचे राज्य तलाठी संघाच्या सूत्रांनी सांगितले.  शेतकरी अडचणीत सध्या राज्यात अनेक ठिकाणी ही केंद्रे सुरू झाली आहेत. काही ठिकाणी सुरू होत आहेत. शेतकऱ्यांची नोंदणी घेण्याचे कामही सुरू झाले आहे. विशेष करून सोयाबीन, उडीद आदी पिकांसाठी ही केंद्रे उपयुक्त ठरणार आहेत. मात्र नियमाच्या कचाट्यात शेतकरी अडकल्याने त्याची पूर्णपणे नाकेबंदी झाल्यासारखीच परिस्थिती आहे. प्रतिक्रिया शेतकऱ्याने आणलेला सोयाबीन त्याचाच आहे का हे पाहण्यासाठी या पिकाची नोंद असलेला सातबारा अत्यावश्‍यक आहे. आम्हाला तो घ्यावाच लागतो. या तांत्रिक अडचणी असल्या तरी नियमानुसार हा उतारा पाहिल्याशिवाय आम्ही शेतमाल खरेदी करू शकत नाही. - मनोहर पाटील,  मार्केटिंग अधिकारी, पणन विभाग, कोल्हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com