agriculture news in Marathi, Base import prices of most edible oils raised, Maharashtra | Agrowon

खाद्यतेलांच्या किमान आयात मूल्यात वाढ
कोजेन्सिस वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली ः सरकारने रिफाइंड, ब्लिच्ड आणि शुद्ध पामतेलाचे (आरबीडी) किमान आयात मूल्य सोडून बाकी सर्व खाद्यतेलांच्या किमान आयात मूल्यात वाढ केली आहे, अशी माहिती सरकारच्या वतीने गुरुवारी (ता. १५) प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनातून मिळाली आहे. तेलबिया उत्पादन कमी होत असल्याने भारत हा मोठा खाद्यतेल आयातदार देश आहे.

नवी दिल्ली ः सरकारने रिफाइंड, ब्लिच्ड आणि शुद्ध पामतेलाचे (आरबीडी) किमान आयात मूल्य सोडून बाकी सर्व खाद्यतेलांच्या किमान आयात मूल्यात वाढ केली आहे, अशी माहिती सरकारच्या वतीने गुरुवारी (ता. १५) प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनातून मिळाली आहे. तेलबिया उत्पादन कमी होत असल्याने भारत हा मोठा खाद्यतेल आयातदार देश आहे.

जगात तेलबिया उत्पादन घटणार असल्याचा अंदाज नुकताच अमेरिकेच्या कृषी विभागने जाहीर केला आहे. त्यातच देशात तेलबिया पिकांचे दर हमीभावाच्याही खाली गेले आहेत आणि अलीकडेच दोन दिवासांपूर्वी देशातील काही भागांत झालेल्या गारपिटीने तेलबिया पिकांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे देशात आणि जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढतील असा अंदाज बांधून व्यापारी आयात करतील आणि परिणामी देशातील तेलबिया पिकांचे दर पडतील, अशी भीती व्यक्त केली जात होती. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर खाद्यतेलाच्या बदलत्या किमती आणि विदेशी चलनाच्या मूल्यात होणारे बदल यामुळे सरकारने खाद्यतेलांच्या किमान आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आसल्याचे सूत्रांनी सांगितले.

क्रूड सोयातेलाच्या किमान आयात मूल्यात किंचित वाढ झाली आहे. क्रूड सोयातेलाचे मूल्य प्रतिटनामागे ९ डॉलरने वाढले असून, आता प्रतिटन ८३१ डॉलर मूल्य झाले आहे. तसेच क्रूड पामतेलाच्या किमान आयात मूल्य ६ डॉलरन वाढून ६८१ डॉलर प्रतिटन झाले आहे. तर ‘आरबीडी’ पामतेलाचे मूल्य हे ६८६ डॉलरवरून ६८८ डॉलर करण्यात आले आहे. भारत हा खाद्यतेल आयातदार देश आहे. 

२०१६-१७ या वर्षात १५.१ दशलक्ष टन खाद्यतेल आयात झाली होती, तर त्याआधीच्या वर्षी १४.६ दशलक्ष टन आयात होती. डिसेंबर २०१७ मध्ये १.१ दशलक्ष टन आयात झाली होती, अशी माहिती सॉल्व्हेंट एक्ट्राक्टर्स असोसिएशनने दिली आहे. आयात होणाऱ्या खाद्यतेलापैकी जवळपास ८.५ दशलक्ष टन पामतेल होते. त्याची आयात मुख्य करून इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांतून होते. सोयातेलाची मुख्य आयात ही अर्जेंटिना देशातून होते. अर्जेंटिना हा जगातील तिसरा सर्वांत मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे.

असे झाले बदल...

  • क्रूड सोयातेलाचे किमान आयात मूल्य ८२२ डाॅलरवरून वाढून ८३१ डाॅलरपर्यंत वाढविले.
  •  ‘आरबीडी’ पामोलिनच्या किमान आयात मूल्यात ६९५ वरून ६८६ डॉलरपर्यंत वाढ
  • क्रूड पामोलिनचे मूल्य ६९२ डॉलरवरून ६९५ डॉलरवर गेले.
  • ‘आरबीडी’ पामतेलाचे किमान आयात मूल्य ६८८ डॉलरवरून कमी होऊन ६८६ डॉलर झाले आहे. 
  • क्रूड पामोलिनचे मूल्य ६ डॉलरने वाढून ६७५ वरून ६८१ डॉलरवर गेले आहे.

इतर अॅग्रो विशेष
महाबळेश्वरमध्ये हिमकणांची चादरमहाबळेश्वर, जि. सातारा  ः राज्यात सर्वत्र...
‘एल निनो’चा यंदा माॅन्सूनला धोका नाहीपुणे ः प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ सप्टेंबर...
मध्य महाराष्ट्र, काेकणात हलक्या पावसाचा...पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
भारत हवामान बदलाला सर्वांत संवेदनशीललंडन ः भारत हा जागातील सर्वांत जास्त हवामान...
‘अविश्वास’ला विश्वास ठरावाने उत्तरमुंबई : विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे...
सरकारने लोकशाहीचा खून केला : विरोधकांचा...मुंबई : विधानसभा अध्यक्षांविरोधात प्रस्ताव दाखल...
लोकपाल, हमीभावासाठी अण्णांचा रामलीलावर...नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत आश्वासन देऊनही मोदी...
बहुविध पिके, तंत्रज्ञान यांचा सुरेख...मुंबईतील चांगली नोकरी सोडून शेतीतच प्रगती करायची...
परस्परांची साथ लाभली,प्रगतीची दारे खुली...लातूर जिल्ह्यातील जवळा (बु.) व्हाया बोरगाव येथील...
नारळाच्या झावळ्यांपासून खतनारळ झाडास महिन्याला एक नवीन पान (झावळी) येत असते...
मध्य महाराष्ट्रात उद्या तुरळक ठिकाणी...पुणे : मध्य महाराष्ट्र ते कर्नाटकचा दक्षिण भाग या...
राज्यात हिरवी मिरची प्रतिक्विंटल १०००...पुण्यात प्रतिक्विंटल १५०० ते ३५०० रुपये पुणे ः...
यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य योजनेतील...परभणी : जलसमृद्धी यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य...
‘कमी दाबक्षेत्रा’च्या पूर्वानुमानात...पुणे : कमी दाबक्षेत्राचे हवामान अंदाजात...
बोंड अळीच्या नुकसानभरपाईपासून शेतकरी...नगर : बोंड अळीमुळे ८० ते ९० टक्के नुकसान झाले....
तूर खरेदीसाठी लाच घेणाऱ्या ग्रेडरला अटकहिंगोली ः कळमनुरी (जि. हिंगोली) येथील कृषी...
तूर, हरभरा हमीभाव खरेदीतील अपयशावरून...मुंबई : हमीभावाने शेतीमालाच्या खरेदीतील सरकारी...
हरभऱ्याला सात टक्के निर्यात प्रोत्साहननवी दिल्ली : हमीभावाच्या खाली असलेल्या...
शेतकऱ्यांसाठीची पहिली औद्योगिक वसाहत...मुंबई : शेतकऱ्यांची पहिली औद्योगिक वसाहत...
कृषिपंपांच्या कनेक्शन तोडणीला स्थगिती...मुंबई: राज्यभरातील शेतकऱ्यांचा रोष आणि...