agriculture news in marathi, Based on cotton, determine the rate of cotton | Agrowon

रुईच्या आधारे ठरवा कापसाचा दर
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

नागपूर : रुईच्या टक्‍केवारीनुसार कापसाला दर मिळावा, या संदर्भाने ‘ॲग्रोवन’मध्ये प्रकाशित वृत्तानंतर भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत असलेली पंचवार्षिक आढावा समितीद्वारे या संदर्भाने पाठपुरावा केला जाणार आहे. समितीचे अध्यक्ष तसेच माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी त्या संदर्भाने दुजोरा दिला.

नागपूर : रुईच्या टक्‍केवारीनुसार कापसाला दर मिळावा, या संदर्भाने ‘ॲग्रोवन’मध्ये प्रकाशित वृत्तानंतर भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत असलेली पंचवार्षिक आढावा समितीद्वारे या संदर्भाने पाठपुरावा केला जाणार आहे. समितीचे अध्यक्ष तसेच माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी त्या संदर्भाने दुजोरा दिला.

भारतात कापसात रुईचे प्रमाण ३३ ते ३४ टक्‍के इतकेच गृहीत धरून कापसाला प्रती क्‍विंटल दर दिला जात आहे. जागतिकस्तरावर मात्र कापूस विकताना त्यातील रुईचे प्रमाण आधी निश्‍चित केले जाते त्याआधारे दर ठरविला जातो. त्यासाठी जिनींगची यंत्रणा अनेक देशांमध्ये उभारली गेली आहे. सद्यस्थितीत भारतीय कापूस वाणात ३६ ते ३७ टक्‍के रुईचे प्रमाण आहे. परंतु, बाजार समिती स्तरावर ही टक्‍केवारी काढण्यासाठी जिनींगची व्यवस्था नसल्याने रुईची टक्‍केवारी अपेक्षीत धरुनच दर दिला जातो. भारतीय टेक्‍सटाईल असोसिएशनचे माजी अध्यक्ष पि.डी. पटोडीया तसेच कापूस शेतीचे अभ्यासक गोविंद वैराळे यांनी कापसाला रुईच्या टक्‍केवारी आधारे दर मिळाल्यास कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हित साधले जाणार असा मुद्दा मांडला होता. त्या संदर्भाने ‘ॲग्रोवन’मधून वृत्तही प्रकाशित झाले. त्याची दखल घेत क्‍युआरटी टिमच्या माध्यमातून या संदर्भाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. शरद निंबाळकर यांनी दिली.

काय आहे पंचवार्षिक आढावा समिती ?
कापसासंदर्भाने देशाअंतर्गत धोरण काय असावे ? याविषयी अभ्यासपूर्ण मसूदा ही टिम मांडते. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या माध्यमातून केंद्र सरकारला हा अहवाल सादर केला जातो. त्याकरिता कापूस पिकविणाऱ्या राज्याचा दौरा करून त्या ठिकाणची माहिती मिळविली जाते. लवकरच ही टिम राजस्थानच्या दौऱ्यावर जाणार आहे. या समितीचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे.

 

इतर अॅग्रो विशेष
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...
खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्रीचाळीसगाव, जि. जळगाव ः लांबलेल्या व अवेळी पडलेल्या...
रब्बी पेरणी २० टक्क्यांनी घटलीनवी दिल्ली ः देशातील बहुतांशी भागात यंदाच्या...
सातारा, सोलापूर, परभणीत ऊसदरासाठी आंदोलनपुणे ः गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच...
निर्यातीच्या केळीला १८०० रुपये दरजळगाव ः राज्यात निर्यातीच्या केळीला यंदा उच्चांकी...
नागपूर, गोंदिया गारठलेपुणे : उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
दक्षिण महाराष्टात ऊसतोडी सुरूकोल्हापूर : ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. ११) दुपारी...