agriculture news in marathi, The basis of the broilers market due to balanced supply | Agrowon

संतुलित पुरवठ्यामुळे ब्रॉयलर्सच्या बाजाराला आधार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

नवरात्रोत्सवामुळे चिकनच्या सर्वसाधारपण खपात मोठी घट झाली असली तरी संतुलित पुरवठ्यामुळे ब्रॉयलर्सच्या बाजारात मोठी नरमाई आली नाही.
ना शिक विभागात शनिवारी (ता. १३) रोजी ७४ रु. प्रतिकिलो दराने ब्रॉयलर्स पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. आठवडाभरात बाजारभाव प्रतिकिलो मागे ५ रु. ने नरमले. दुसरीकडे, पुणे विभागात अंड्याच्या दरात प्रतिशेकडा ७ रुपयाने वाढ दिसली.

नवरात्रोत्सवामुळे चिकनच्या सर्वसाधारपण खपात मोठी घट झाली असली तरी संतुलित पुरवठ्यामुळे ब्रॉयलर्सच्या बाजारात मोठी नरमाई आली नाही.
ना शिक विभागात शनिवारी (ता. १३) रोजी ७४ रु. प्रतिकिलो दराने ब्रॉयलर्स पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. आठवडाभरात बाजारभाव प्रतिकिलो मागे ५ रु. ने नरमले. दुसरीकडे, पुणे विभागात अंड्याच्या दरात प्रतिशेकडा ७ रुपयाने वाढ दिसली.

पुण्यातील योजना पोल्ट्रीचे संचालक व थेट चिकन विक्रेते राजू भोसले म्हणाले,   की ऐन नवरात्रात खपात ४० टक्क्यांपर्यंत घट दिसत आहे. तरीही बाजारभाव फारसे घटले नाही. सध्या चिकनच्या खपात ट्रेंड बदलत आहे. उपवासाच्या सण उत्सवात चिकनचे दर खाली गेले की खरेदी वाढते. दुसरी गोष्ट, पूर्वी फक्त रविवारीच   ग्राहकांची मोठी गर्दी दिसायची. अलीकडे, बुधवार आणि शुक्रवारीही ग्राहकांची वर्दळ दिसते. त्यामुळे चिकनकडे ग्राहकांचा  वाढता ओढा बाजाराला आधार देतो, असे म्हणण्यास वाव आहे. दसऱ्यानंतर ओपन इंटिग्रेटर्स, शेतकऱ्यांचा मालही बाजारात येईल. त्या वेळी तापमानात थोडीफार घट झाली तर खपवाढीला चालना मिळेल.

अंडी बाजाराबाबत श्री. भोसले म्हणाले, ‘नवरात्रात सहसा अंड्याचे दर वाढत नाही. पण, यावर्षी बाजारात थोडीफार का होईना वाढ दिसली आहे. बाजार पडण्याऐवजी स्थिर राहणे किंवा अल्पशी का होईना वाढ दिसते, ही अंड्याच्या बाजारासंदर्भात अपवादात्मक बाब आहे. येथेही वाढता खप हे परिमाण आपण लावू शकताे. एकूणच पोल्ट्री उद्योगाच्या दृष्टीने ही आश्वासक बाब आहे.’
कोमरला समूहाचे संचालक कृष्णचरण म्हणाले, की नवरात्र काळात मागणी घटल्यामुळे मागील आठवड्यात महाराष्ट्रातील ब्रॉयलर मार्केटमध्ये नरमाई दिसली. मात्र, संबंधित कालावधीसाठी मागणीच्या तुलनेत संतुलित पुरवठ्याचे नियोजन करण्यात आल्यामुळे बाजारभावात फारशी पडझड झाली नाही.

किंबहूना शनिवारी (ता. १३) लिफ्टिंग दर ७५ रु. प्रतिकिलो दरम्यान होता. थोड्या फार फरकाने का होईना बाजारभाव उत्पादन खर्चाच्या वर आहे, ही जमेची बाजू होय. यापुढील काळात साधारणपणे दसऱ्यानंतर खपात वाढ होईल, पर्यायाने बाजारभाव उंचावण्यास हातभार लागेल. दक्षिण भारातातील बाजारभाव किफायती पातळ्यांवर आहे. बंगळूर आणि हैदराबादेतील लिफ्टिंग दर ७७ ते ७८ रु. प्रतिकिलोच्या दरम्यान आहे. संतुलित पुरवठ्याच्या नियोजनामुळे पुढच्या आठवड्यात बाजारभाव नक्की वाढेल. एकूण देशातील ब्रॉयलर बाजारभावाच्या दृष्टीने आशायदाक चित्र दिसतेय.

ऑक्टोबर हिटमुळे बाजाराला आधार
ब्रॉयलर पोल्ट्री विभागात वाढत्या तापमानामुळे पक्ष्यांचे वजन वाढत नाही. खासकरून मालेगावसारख्या विभागात ३५ अंशापुढे तापमानाचा पारा पोचला आहे. याशिवाय, पुणे व नाशिक अनुक्रमे ३४ अंशावर पोचले आहे. अलिबाग येथेही ३२ अंशावर पारा सरकला आहे. यामुळे उत्पादन नियंत्रित होण्यास मदत मिळाली आहे.

इतर अॅग्रोमनी
कापूस, गवार बी आणि हरभऱ्याचे भाववाढीचे...या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने साखर वगळता...
हरभरा निर्यात, स्थानिक मागणीत वाढ या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका व गहू...
सीताफळाच्या मूल्यवर्धनातून घेतला...`उद्योगाच्या घरी, रिद्धीसिद्धी पाणी भरी`, अशी...
कापसाच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता...
हलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची...नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
कृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
हरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...
भात निर्यातीसाठी मागणीबरोबरच भूराजकीय...भारतीय भात निर्यातदारांच्या वाढीसाठी जागतिक...
मका, साखर, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन...
अर्थमंत्री जेटली १ फेब्रुवारीला...नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार त्यांच्या...
कापूस उद्योगाचे अमेरिका-चीनच्या...जळगाव : चीन व अमेरिकेत मागील नऊ महिन्यांपासून...
सातत्याने ताळेबंद तपासत शेती राखली...जळगाव जिल्ह्यातील नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील...
हळदीच्या निर्यात मागणीत वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सर्वच शेती...
हळदीच्या स्थानिक, निर्यात मागणीत वाढया सप्ताहात नाताळच्या सुटीमुळे आंतरराष्ट्रीय...
ग्राहकाला आधारसक्ती केल्यास 1 कोटींचा...नवी दिल्ली: दूरसंचार कंपन्यांकडून मोबाइल फोन...
युरियाची आयात ४२ लाख टनांवरनवी दिल्ली : भारताची चालू आर्थिक वर्षातील...
मका, हळद वगळता इतर शेतमालाच्या भावात वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस व...
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...