agriculture news in marathi, be alert for questions of the farmers says Bachhu Kadu | Agrowon

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पेटून उठा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

सेलू, जि. परभणी : कधी गारपीट, कधी अवकाळी पाऊस, कधी जास्त तर कधी कमी पाऊस; यापेक्षा जास्त शासनाच्या धोरणाने शेतकरी मरत आहेत. शेतकऱ्यांची मेहनत कोणीच मोजत नाही. जाती-धर्माच्या नावाने जेवढे पेटून उठता तेवढेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पेटून उठा, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी सोमवारी (ता. १९) केले.

सेलू, जि. परभणी : कधी गारपीट, कधी अवकाळी पाऊस, कधी जास्त तर कधी कमी पाऊस; यापेक्षा जास्त शासनाच्या धोरणाने शेतकरी मरत आहेत. शेतकऱ्यांची मेहनत कोणीच मोजत नाही. जाती-धर्माच्या नावाने जेवढे पेटून उठता तेवढेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पेटून उठा, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी सोमवारी (ता. १९) केले.

सेलू (जि. परभणी) येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व छत्रपती संभाजीराजे भोसले चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे आयोजित चारदिवसीय राज्यस्तरीय बळिराजा कृषी प्रदर्शनाचे उद्‍घाटन आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते झाले.

यावेळी अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विनोद बोराडे हे होते. स्वागताध्यक्ष तथा आमदार विजय भांबळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला राठोड, सहायक जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती अशोक काकडे, कृषी सभापती श्रीनिवास मुंढे, डाॅ. संजय रोडगे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र लहाने, राम पाटील, रामराव उबाळे, इंद्रायणी रोडगे, कृषी विकास अधिकारी बी. एस. कच्छवे, तहसीलदार विद्याचरण कडवकर, स्वरूप कंकाळ, डाॅ. यू. एन. आळसे, मुख्य संयोजक छगन शेरे, अजय चौधरी, डाॅ. शरद कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.आमदार कडू म्हणाले की, मिरवणूक वजा करून कृषी प्रदर्शन भरवले ही काळाची गरज आहे. व्यवस्था वाईट आहे. ज्यांचा आवाज आहे त्यांचीच सत्ता आहे. जितका इंच नांगर जमिनीत घालता त्याच्या अर्धा तरी नांगर सरकारात घातला तर तुमचे सर्व प्रश्न सुटतील. राजकारणाचे शुद्धीकरण होणे गरजेचे आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
वारणा नदीवरील बंधारा दुरुस्तीमुळे...कोल्हापूर  : वारणा नदीवरील विविध बंधाऱ्यांची...
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...