agriculture news in marathi, Be Sensitivized During Drought: Dr. Bharud | Agrowon

दुष्काळात संवेदनशीलता बाळगा : डॉ. भारूड
टीम अॅग्रोवन
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

सोलापूर : जिल्ह्यातील नऊ तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. उर्वरित दोन तालुक्‍यांचा अहवालही सरकारला पाठविला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी दुष्काळाच्या बाबतीत संवेदनशीलता बाळगण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या.

जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या समन्वय समितीची बैठक यशवंतराव चव्हाण सभागृहात भारुड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. दुष्काळात नेमक्‍या काय उपाययोजना कराव्यात याचीही त्यांनी माहिती दिली.

सोलापूर : जिल्ह्यातील नऊ तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. उर्वरित दोन तालुक्‍यांचा अहवालही सरकारला पाठविला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी दुष्काळाच्या बाबतीत संवेदनशीलता बाळगण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या.

जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या समन्वय समितीची बैठक यशवंतराव चव्हाण सभागृहात भारुड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. दुष्काळात नेमक्‍या काय उपाययोजना कराव्यात याचीही त्यांनी माहिती दिली.

एखाद्या गावातून पाण्याबाबतचा अर्ज आल्यास त्याबाबत संवेदनशील होऊन पाहणी करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात. त्या गावामध्ये पाणी देण्यासाठी काय करणे सोईस्कर आहे. त्या गावाची गरज काय आहे, याचीही पाहणी करावी. या काळात दुष्काळाच्या कामाला प्राधान्य देण्यासही त्यांनी सांगितले. दुष्काळ, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यासह एकूण ४० मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.

अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई असल्याचे कृषी समितीचे सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी सांगितले होते. त्याबाबत डॉ. भारुड म्हणाले, ‘‘या दोन्ही तालुक्‍यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या ठिकाणी टॅंकर सुरू करण्याची विनंती त्यांना करणार आहे. त्यामुळे त्या गावातील पाणीप्रश्‍नही सुटण्यास मदत होईल.``

‘दक्षिण'चे बीडीओ बेस्ट

दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड यांना उत्कृष्ट काम केल्याबद्दल ३१२ गुण मिळाले. त्यामुळे ऑक्‍टोबर महिन्याचा बेस्ट ‘बीडीओ''चा सन्मान मरोड यांना मिळाला. त्याखालोखाल बार्शीच्या गटविकास अधिकाऱ्यांना २९८, तर मंगळवेढा तालुक्‍याच्या गटविकास अधिकाऱ्यांना २७२ गुण मिळाले. त्यांचेही या वेळी अभिनंदन केले.

इतर बातम्या
खानदेशात तूर खरेदीबाबत ऑफलाइन नोंदणी...जळगाव ः खानदेशात तूर खरेदीसंबंधी शासकीय...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...