agriculture news in Marathi, beater guard at 1300 to 2300 rupees in jalgaon, Maharashtra | Agrowon

जळगावात कारली प्रतिक्विंटल १३०० ते २३०० रुपये
टीम अॅग्रोवन
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ११) कारल्याची चार क्विंटल आवक झाली होती. या वेळी कारल्यास प्रतिक्विंटल १३०० ते २३०० व सरासरी १९०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ११) कारल्याची चार क्विंटल आवक झाली होती. या वेळी कारल्यास प्रतिक्विंटल १३०० ते २३०० व सरासरी १९०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  

सफरचंदाची ७० क्विंटल आवक झाली होती, त्यास ४५०० ते ७००० व ६००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. बटाट्याची ३०० क्विंटल आवक झाली. त्याला २७५ ते ६०० आणि सरासरी ३७५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. लाल कांद्याची ३२५ क्विंटल आवक झाली होती, त्यास ११२५ ते २५०० आणि १८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. हिरव्या मिरचीची ८७ क्विंटल आवक झाली होती, तीस १२०० ते २००० आणि सरासरी १६०० रुपये प्रतिक्विंटल दर होता.

ढोबळी मिरचीची तीन क्विंटल आवक होऊन २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. भेंडीची सात क्विंटल आवक झाली होती. तीस ११०० ते २२०० आणि सरासरी १७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मेथीची सात क्विंटल आवक होऊन १५०० ते ३००० व सरासरी २१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. फ्लॉवरची आवक दोन क्विंटल झाली होती तीस १००० ते २५०० व सरासरी १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. वांग्यांची ४८ क्विंटल आवक तर ९०० ते २०००व सरासरी १५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. टोमॅटोची २९ क्विंटल आवक होऊन १८०० ते ४००० व सरासरी ३१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता.

भोपळ्याची दोन क्विंटल आवक झाली, त्यास १५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मोसंबीची १० क्विंटल आवक होऊन १७०० ते ३००० व सरासरी २२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. सिताफळाची पाच क्विंटल आवक तर २००० ते ४००० आणि सरासरी २८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

इतर ताज्या घडामोडी
जात पडताळणीसाठी रक्त नात्यातील दाखला...नागपूर : रक्त नात्यातील व्यक्तीची जात पडताळणी...
कोंबडीखताचा वापर कसा करावा?मशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर...
ऊस पाचटाचे गांडूळ खत कसे तयार करावे?गांडूळ खताच्या निर्मितीसाठी उत्तम निचरा होणारी...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, बाजरी, मका... कापूस बीटी कापूस बोंड अळ्यांना प्रतिकारक्षम...
मका, सोयाबीन, हळदीच्या भावात घसरणएनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात साखर व सोयाबीन वगळता...
अभिनव पद्धतीने सणसरला आंदोलनभवानीनगर, जि. पुणे   ः सणसर येथील कुरवली...
मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध :...नागपूर : मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत...
पुणे जिल्ह्यातील काही भागांत पावसाची...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या दहा...
खारपाणपट्ट्यात भूसुधारणा कार्यक्रम...अकोला  : जिल्ह्यात खारपाणपट्ट्याचे प्रमाण...
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....