agriculture news in marathi, Beed lead in rabbi sowing | Agrowon

रब्बी पेरणीत बीडची आघाडी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांपैकी रब्बी पेरणीत बीड जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख ६१ हजार ६८८ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली असून, त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात १ लाख ३० हजार ३६२ हेक्‍टरवर, तर औरंगाबाद जिल्ह्यात ९० हजार ८५७ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांपैकी रब्बी पेरणीत बीड जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख ६१ हजार ६८८ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली असून, त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात १ लाख ३० हजार ३६२ हेक्‍टरवर, तर औरंगाबाद जिल्ह्यात ९० हजार ८५७ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे.

बीड जिल्ह्यातील पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी सर्वाधिक पेरणी आष्टी तालुक्‍यात ६१ हजार ८४५ हेक्‍टरवर झाली आहे. त्यापाठोपाठ अंबाजोगाई तालुक्‍यात ४१ हजार ४९३ हेक्‍टरवर, बीड तालुक्‍यात ३० हजार ६२ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली. पाटोदा तालुक्‍यात १८ हजार ८५ हेक्‍टरवर, गेवाराई तालुक्‍यात २३ हजार २४४, माजलगाव तालुक्‍यात २१ हजार ९२४, केज तालुक्‍यात २६ हजार २३, परळी तालुक्‍यात १७२९०, वडवणी तालुक्‍यात ४३८५, धारूर तालुक्‍यात २ हजार ९१२, तर शिरूर कासार तालुक्‍यात १४ हजार ४२५ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्‍यात सर्वाधिक २६ हजार २६३ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली. त्यापाठोपाठ जालना तालुक्‍यात २३ हजार ११४ हेक्‍टरवर, घनसावंगी तालुक्‍यात २० हजार ९३६ हेक्‍टरवर, बदनापूर तालुक्‍यात १६ हजार ००९ हेक्‍टरवर, परतूर तालुक्‍यात ११ हजार ४३१ हेक्‍टरवर, अंबड तालुक्‍यात १३ हजार ३०४ हेक्‍टरवर, भोकरदन तालुक्‍यात १० हजार ९७७ हेक्‍टरवर, तर जाफ्राबाद तालुक्‍यात ८ हजार ३२८ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात १५ हजार ८७७ हेक्‍टरवर पैठण तालुक्‍यात रब्बीची पेरणी झाली. औरंगाबाद तालुक्‍यात १३ हजार ३७२ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली. त्यापाठोपाठ खुल्ताबाद तालुक्‍यात ११ हजार ९५४ हेक्‍टरवर, गंगापूर तालुक्‍यात १६ हजार ७८७ हेक्‍टरवर, वैजापूर तालुक्‍यात ९ हजार ९७५ हेक्‍टरवर, कन्नड तालुक्‍यात ९ हजार १७३ हेक्‍टवर, सिल्लोड तालुक्‍यात १० हजार १०१ हेक्‍टरवर, फुलंब्री तालुक्‍यात २ हजार ८६२ हेक्‍टरवर, तर सोयगाव तालुक्‍यात ७५६ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे.

सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत सर्वात कमी पेरणी औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्‍यात केवळ १५ टक्‍के झाली. सर्वाधिक पेरणी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्‍यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत अधिक रब्बीची पेरणी झाली आहे.
औरंगाबाद, जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत यंदा ३ लाख ९२ हजार ९६९ हेक्‍टर रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र गृहीत आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत २ लाख ४८ हजार २२२ हेक्‍टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे.

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...