वाशीममध्ये सोयाबीन अनुदान देण्यास सुरवात

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

वाशीम : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत विक्री केलेल्या सोयाबीनला प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला होता. त्यानुसार वाशीम जिल्ह्यातील पात्र ४४ हजार ६१८ लाभार्थ्यांना हे अनुदान वितरणास सुरवात झाली आहे. अनुदानास पात्र शेतकऱ्यांनी अनुदानाची रक्कम आपल्या खात्यात जमा झाल्याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी केले अाहे.

२०१६-१७ मध्ये सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे बाजारातील आवक वाढून दरात घसरण झाली होती. यात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समित्यांतर्गत आडत व्यापाऱ्यांकडे सोयाबीनची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये याप्रमाणे २५ क्विंटल मर्यादेपर्यंत अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले होते.

त्यानुसार जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्री केलेल्या व अनुदानास पात्र ठरलेल्या ४४ हजार ६१८ शेतकऱ्यांना १४ कोटी ७९ लाख १३ हजार ५९४ रुपये रकमेचे वाटप करण्यात येणार आहे.

वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ९ हजार ५८८ शेतकऱ्यांना २ कोटी ७५ लाख २१ हजार ७१२ रुपये, रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ६ हजार ९०७ शेतकऱ्यांना २ कोटी १३ लाख १८ हजार ७३४ रुपये, मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ५ हजार ४४० शेतकऱ्यांना १ कोटी ८५ लाख ४६ हजार ३५४ रुपये, मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ९ हजार ४३६ शेतकऱ्यांना २ कोटी ६० लाख २१ हजार २७८ रुपये, कारंजा बाजार समितीमधील ११ हजार ३१९ शेतकऱ्यांना ४ कोटी ८७ लाख ४१ हजार ८३६ रुपये व मानोरा बाजार समितीमधील १ हजार ९२८ शेतकऱ्यांना ५७ लाख ६३ हजार ६८० रुपये अनुदान वितरित करणार असल्याचे श्री. कटके यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com