agriculture news in marathi, Beginning of mango mangoes in Kolhapur | Agrowon

कोल्हापुरात आंब्यांच्या आवकेस सुरवात
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डात कोकणी हापूस आंब्यांची आवक सुरू झाली आहे. त्याच्या मुहूर्ताचे सौदे बुधवारी (ता. ५) जिल्हा सहकार निबंधक अरुण काकडे व विशेष लेखा परीक्षक वर्गचे बी. बी. यादव यांच्या हस्ते काढण्यात आले. यात पाच डझनाच्या पेटीस ११ हजार ५०० रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. आंबा पूर्ण क्षमतेने बाजारपेठेत येण्यासाठी अजूनही दोन महिने बाकी आहेत. तरीही कोकणातील काही बागायतदारानी प्रयोगशील उत्पादन घेतले आहे. पूर्ण तयार झालेला आंबा बाजारपेठेत आला आहे.

कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डात कोकणी हापूस आंब्यांची आवक सुरू झाली आहे. त्याच्या मुहूर्ताचे सौदे बुधवारी (ता. ५) जिल्हा सहकार निबंधक अरुण काकडे व विशेष लेखा परीक्षक वर्गचे बी. बी. यादव यांच्या हस्ते काढण्यात आले. यात पाच डझनाच्या पेटीस ११ हजार ५०० रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. आंबा पूर्ण क्षमतेने बाजारपेठेत येण्यासाठी अजूनही दोन महिने बाकी आहेत. तरीही कोकणातील काही बागायतदारानी प्रयोगशील उत्पादन घेतले आहे. पूर्ण तयार झालेला आंबा बाजारपेठेत आला आहे.

शाहू मार्केट यार्डातील फळ बाजारातील यासिन बालम बागवान व इकबाल मेहबूब बागवान यांच्या अडत दुकानात हापूस आंब्यांची आवक झाली. त्याचे सौदे बाजार समितीचे नूतन सभापती बाबासाहेब लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

पाच हजार रुपयांपासून बोलीस सुरवात झाली. भाव वाढत गेले. अखेर चार खरेदीदारांनी प्रत्येकी दोन पेट्या खरेदी केल्या. गतवर्षीच्या तुलनेत यंदा एक महिना अगोदरच हापूस आंबा बाजार पेठेत आला आहे. यंदाच्या हंगामासाठी कोल्हापूरातील ४० हून अधिक घाऊक व्यापाऱ्यांनी आंब्याची मागणी नोंदविली आहे.

इतर बाजारभाव बातम्या
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५९० रुपये...अकोला ः हंगामाच्या तोंडावर पैशांची तजवीज...
नाशिकमध्ये आले प्रतिक्विंटल ८७०० ते...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
सोलापुरात हिरवी मिरची, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कळमणा बाजार समितीत हरभरा ४१०० रुपयांवरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा वगळता...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची ३८०० ते ४०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
मंचरला कांद्याच्या भावात घसरणमंचर, जि. पुणे : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर...
रत्नागिरीत टॉमेटो प्रतिक्विंटल ३००० ते...रत्नागिरी ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५२५ रुपये...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक आणि दरात...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
अमरावती बाजारात भुईमूग शेंगांचे दर आणि...अमरावती ः स्थानिक बाजार समितीत नव्या भुईमूग...
सोलापुरात वांगी, टोमॅटो, हिरवी मिरची...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
टोमॅटो, हिरवी मिरचीची आवक कमी; दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत गवार १५०० ते ५००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल ३०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ३०० ते १७००...औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल ३०० ते १४०० रुपये...
चोपडा, अमळनेर बाजार समित्यांमध्ये...जळगाव ः देशी व काबुली प्रकारच्या हरभऱ्याचे दर...
जळगावात लाल कांद्याच्या दरांवर पुन्हा...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अमरावतीत भुईमूग प्रतिक्‍विंटल ५२००...अमरावती ः स्थानिक बाजार समितीत हंगामातील नव्या...