agriculture news in marathi, On behalf of `Atma` Thanjavur, Trichy study tour of farmers | Agrowon

‘आत्मा'च्या वतीने शेतकऱ्यांची तंजावूर, त्रिचीला अभ्यास सहल
टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

सोलापूर : कृषितंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे (आत्मा) परराज्यांतील कृषी व प्रक्रिया उद्योगातील संधींचा अभ्यास करण्याच्या अनुषंगाने तमिळनाडूतील तंजावूर, त्रिची, मदुराई आदी शहरांतील कृषी संशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालये आणि अन्नप्रक्रिया उद्योग संस्थांच्या अभ्यास सहलीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. सात दिवसांच्या या दौऱ्यात त्रिचीच्या राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र आणि तंजावूरचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फूड प्रोसेसिंग टेक्‍नॉलॉजीतील भेट शेतकऱ्यांसाठी अविस्मणीय ठरली.

सोलापूर : कृषितंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे (आत्मा) परराज्यांतील कृषी व प्रक्रिया उद्योगातील संधींचा अभ्यास करण्याच्या अनुषंगाने तमिळनाडूतील तंजावूर, त्रिची, मदुराई आदी शहरांतील कृषी संशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालये आणि अन्नप्रक्रिया उद्योग संस्थांच्या अभ्यास सहलीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. सात दिवसांच्या या दौऱ्यात त्रिचीच्या राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र आणि तंजावूरचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फूड प्रोसेसिंग टेक्‍नॉलॉजीतील भेट शेतकऱ्यांसाठी अविस्मणीय ठरली.

‘आत्मा'चे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, जिल्हा मृद सर्व्हेक्षण व मृद चाचणी अधिकारी एस. बी. जेटगी, मंडल कृषी अधिकारी आर. डी. जाधव, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक मेघराज पौळ (सांगोला), विक्रम सावंजी (मंगळवेढा), सत्यम झिंजाडे, आनंद झिने आदींसह सुमारे ३० शेतकऱ्यांचा यामध्ये सहभाग होता.  पहिल्या दिवशी मदुराईतील कृषी महाविद्यालय, दुसऱ्या दिवशी तंजावूरचे देशातील पहिले इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फूड प्रोसेसिंग टेक्‍नॉलॉजी आणि तिसऱ्या दिवशी त्रिचीतील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राची भेट असे नियोजन होते. या प्रत्येक ठिकाणाहून शेतकऱ्यांना नवनवीन ज्ञान, तंत्रज्ञान पाहता आलेच, पण वेगवेगळी माहिती प्रयोगही अनुभवता आले.

शेतकरी कंपन्या, शेतकरी गट यांना शेतीपूरक उद्योग, प्रक्रिया उद्योग यासाठी अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे, यासाठी आत्मातर्फे सहलीचे आयोजन करतो. स्थानिक भागातील अभ्यास सहली होतातच, पण अशा मोठ्या संस्थांतूनही शेतकऱ्यांना शिकता येते. शेतकरी कंपन्या आणि शेतकरी गटांना या सहलीचा उपयोग होत आहे, अशी माहिती आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे यांनी दिली.

इतर बातम्या
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
मराठवाड्यात रब्बीची केवळ १९ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा दुष्काळाची छाया किती...
शेतकऱ्यांचा आंदोलनानंतर आत्मदहनाचा...राशीन, जि. नगर : कुकडीच्या आवर्तनाचा कालावधी...
सोलापुरात ‘स्वाभिमानी'चे उपोषणकर्ते...सोलापूर : गतवर्षीच्या हंगामातील थकीत एफआरपी...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीद्वारे...परभणी : उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत...
केळीच्या आगारातून आखातात जाणार ४००...जळगाव ः केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून...
दर घसरल्याने कोल्हापुरात उत्पादकांकडून...कोल्हापूर : येथील बाजार समितीत सौदे सुरू असताना...
महाकॉट ब्रॅण्डची चमक पडली फिकीजळगाव ः पूर्व विदर्भ, उत्तर मराठवाडा व खानदेशातील...
बुलडाण्यातील ८ तालुके, २१ मंडळांत...बुलडाणा : कमी पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र...
दुष्काळ, मराठा आरक्षण अधिवेशनात गाजणारमुंबई : उद्यापासून (ता. १९) मुंबईत सुरू होत...
‘सीसीआय’ची कापूस खरेदी मंगळवारपासून...जळगाव : कापूस खरेदीसंबंधी जिनिंगमध्ये केंद्र...
दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात आज...पुणे : दक्षिण भारतामध्ये असलेल्या ‘गज’...
थंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूलमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
दुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात...बीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी...
परभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
नाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल...नाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...