agriculture news in marathi, Belgaum factory will start after Diwali | Agrowon

बेलगंगा कारखाना दिवाळीनंतर होणार सुरू
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 जून 2018

चाळीसगाव, जि. जळगाव ः बेलगंगा सहकारी साखर कारखान्यात बुधवारी (ता. १४) अंबाजी कंपनीतर्फे ‘मिल रोलर’ पूजन करून दुरुस्ती कामाचा प्रारंभ करण्यात आला. कारखाना पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने विविध विभागातील यंत्रसामग्रीच्या दुरुस्ती कामाला वेग आला आहे. त्यामुळे ऑक्‍टोबरमध्ये कारखाना गळीत हंगाम काढण्यासाठी सज्ज होईल, असा विश्‍वास अंबाजी ग्रुपने व्यक्त केला.

चाळीसगाव, जि. जळगाव ः बेलगंगा सहकारी साखर कारखान्यात बुधवारी (ता. १४) अंबाजी कंपनीतर्फे ‘मिल रोलर’ पूजन करून दुरुस्ती कामाचा प्रारंभ करण्यात आला. कारखाना पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने विविध विभागातील यंत्रसामग्रीच्या दुरुस्ती कामाला वेग आला आहे. त्यामुळे ऑक्‍टोबरमध्ये कारखाना गळीत हंगाम काढण्यासाठी सज्ज होईल, असा विश्‍वास अंबाजी ग्रुपने व्यक्त केला.

जिल्हा बॅंकेकडून लिलाव प्रक्रियेद्वारे अंबाजी ग्रुपने कारखाना विकत घेतल्यानंतर येणाऱ्या विविध अडचणींना तोंड देत, कारखान्यात मशिनरी दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यासाठी ज्येष्ठ व अनुभवी तज्ज्ञांची नियुक्ती कंपनीने केली आहे. याशिवाय कारखान्यात यापूर्वी काम केलेल्या काही कामगारांनाही पुन्हा घेतले आहे.

कारखाना जिल्हा बॅंकेने ताब्यात घेतल्यानंतर तो बंदच होता. त्यामुळे आतील यंत्रसामग्री पडून राहिल्याने मोठ्या प्रमाणावर खराब झालेली आहे. त्यामुळे अंबाजी कंपनीने मुख्य अभियंता म्हणून अर्जुन शिंदे, मुख्य रसायनशास्त्रज्ञपदी अशोक मेमाणे यांची, तर शेतकी अधिकारी म्हणून सुभाष भाकरे यांची नियुक्‍ती केली आहे. या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या दुरुस्तीला सुरवात झाली आहे. पूजनप्रसंगी चित्रसेन पाटील, केदारसिंग पाटील, प्रवीण पटेल, दिलीप चौधरी, विजय अग्रवाल, किरण देशमुख, नीलेश निकम, प्रेमचंद खिवसरा, डॉ. मुकुंद करंबेळकर, डॉ. अभिजित पाटील, अजय शुक्‍ल, जगदीश पाटील, उद्धवराव महाजन, शरद मोराणकर, श्री. ब्राह्मणकार यांच्यासह कंपनीचे संचालक व शेतकरी उपस्थित होते.

सुपारी देऊन केली मोडतोड
हा कारखाना कुठल्याही परिस्थिती सुरू होऊ नये, यासाठी अक्षरशः सुपारी देऊन कारखान्यातील यंत्रसामग्रीची मोडतोड केल्याचा आरोप चित्रसेन पाटील यांनी केला. कारखान्यात दीड व अडीच किलो मेगावॉटचे दोन टर्बाइन असून विक्रीची निविदा निघताच माहितीगार व्यक्‍तीने या टर्बाइनमधील वायडिंग कापले. पुन्हा वायडिंगसाठी लाखो रुपये खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे हेतू पुरस्सर केलेले हे कृत्य केले, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

४ लाख टन होणार गाळप
कारखान्यातील सध्याची यंत्रसामग्रीची दुरुस्त करून काही नवीन साहित्य आणल्यानंतर पाच महिन्यांत कारखान्याकडून जवळपास ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळप केला जाईल, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. कारखान्यात ६० टनांचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स वजनकाटे बसविण्यात येणार आहेत. कारखान्यातील ७० टनांची क्षमता असलेल्या तीन बॉयलरचीही दुरुस्ती झाली. आज विधिवत पूजन करून ‘रोलर’ यंत्रावर बसविण्यात आले.

 

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...