सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा आर्थिक बोजा होणार कमी

सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा आर्थिक बोजा होणार कमी
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा आर्थिक बोजा होणार कमी

सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याऱ्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थ्यांना त्यांच्या हिस्याची भरावी लागणारी रक्कम आता कमी करण्यात आली आहे. ''महावितरण आपल्या दारी'' या उपक्रमांतर्गत वीजजोडणी घेतलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेत ऑनलाइन अर्ज करून सहभागी होता येणार आहे.

शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहेत, यापूर्वी कृषिपंपांसाठी वीजजोडणी घेतली नाही, वीजजोडणीचे पैसे भरून वीजजोडणी प्रलंबित आहे, अशा शेतकऱ्यांना सौरकृषिपंप योजनेत प्राधान्य देण्यात येत आहे. राज्यभरातील सुमारे ६४ हजार ९३८ शेतकऱ्यांचे अर्ज मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी प्राप्त झाले. त्यापैकी १७ हजार ०१६ शेतकऱ्यांना कोटेशनही देण्यात आले.

''महावितरण आपल्या दारी'' या उपक्रमांतर्गत ज्या शेतकऱ्यांना केबलद्वारे वीजपुवठा देण्यात आला होता, अशा शेतकऱ्यांची पायाभूत यंत्रणा उभारून कायमस्वरूपी वीजपुरवठा देण्याबाबत मागणी आली. त्यांनाही सौर कृषिपंप योजनेत ऑनलाइन अर्ज करून सहभागी करून घेण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.

शासनाने या योजनेसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची मान्यता दिली. निविदेद्वारे निश्चित झालेली कृषिपंपांची किंमत ३ एचपी डीसीसाठी १ लाख ६५ हजार ५९४ व ५ एचपी डीसीसाठी २ लाख ४७ हजार १०६ एवढी आहे. ही रक्कम पूर्वीच्या तुलनेत कमी असल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. पूर्वी ३ एचपी डीसीपंपासाठी आधारभूत किंमत २ लाख ५५ हजार व  ५ एचपी डीसीपंपासाठी ३ लाख ८५ हजार होती. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना पूर्वी ३ एचपीसाठी २५ हजार ५०० (दहा टक्के) तर अनुसूचित जाती / जमाती  गटातील लाभार्थ्यांना १२ हजार ७२५ एवढी रक्कम भरावी लागत होती. ती रक्कम आता अनुक्रमे १६ हजार ५६० व ८ हजार २८० एवढी भरावी लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com