समृद्ध शेतकरी अभियानाअंतर्गत सोडतीद्वारे लाभार्थी निश्चित

जळगावमध्ये सोडतीद्वारे लाभार्थी निश्चित
जळगावमध्ये सोडतीद्वारे लाभार्थी निश्चित

अकोला : उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाअंतर्गत शेतीसाठी लागणारे यंत्र, अवजारांसाठी शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला अाहे. जळगाव जामोद तालुक्यात २२०० अर्ज अाले होते. यातून पात्र लाभार्थ्यांची सोडतीद्वारे निवड करण्यात अाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी दिली.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढविण्यासाठी शासन मागील खरीप हंगामापासून उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान राबवीत अाहे. या अभियानातील उपघटक म्हणून कृषी यांत्रिकीकरणाची बाब राबवली जाते. या योजनेसाठी १५ अाॅक्टोबरपर्यंत २२०० शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. ट्रॅक्टर व विविध अवजारांसाठी शेतकऱ्यांनी अर्ज केले. या अर्जांमधून लाभार्थी निवडण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या आवारात सोडत काढण्यात अाली.

या ठिकाणी विविध कंपन्यांच्या ट्रॅक्टर, अवजारांची माहिती होण्यासाठी दालने लावण्यात अाली होती. सोबतच स्टेट बँक अाॅफ इंडियानेही शेतकऱ्यांसाठी राबविल्या जात असलेल्या योजनांची माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com