agriculture news in Marathi, beneficiary selection in last stage for well digging subsidy scheme, Maharashtra | Agrowon

विहीर खोदाई अनुदानासाठी शेतकरी निवड अंतिम टप्प्यात
टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 डिसेंबर 2017

पुणे  : विहीर खोदाईकरिता अडीच लाखांचे अनुदान देण्यासाठी शेतकरी निवडण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या योजनेसाठी राज्यातून ५३ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

शेतकऱ्यांसाठी विहीर खोदाईच्या अनुदानात यंदा कृषी खात्याने दीड लाख रुपयांनी वाढ केली आहे. याशिवाय आधीच्या कामकाजात होणारी वशिलेबाजी थांबविण्यासाठी कृषी विभागाने ऑनलाइन अर्ज पद्धत आणून पारदर्शकता आणण्याचा चांगला पायंडा पाडला आहे. 

पुणे  : विहीर खोदाईकरिता अडीच लाखांचे अनुदान देण्यासाठी शेतकरी निवडण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या योजनेसाठी राज्यातून ५३ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

शेतकऱ्यांसाठी विहीर खोदाईच्या अनुदानात यंदा कृषी खात्याने दीड लाख रुपयांनी वाढ केली आहे. याशिवाय आधीच्या कामकाजात होणारी वशिलेबाजी थांबविण्यासाठी कृषी विभागाने ऑनलाइन अर्ज पद्धत आणून पारदर्शकता आणण्याचा चांगला पायंडा पाडला आहे. 

‘‘या योजनेतून यंदा प्रथमच प्रतिशेतकरी अडीच लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबविली जात आहे. मार्चअखेरपर्यंत १८७ कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना वाटले जाईल,’’ असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. 

विहीर खोदाई अनुदान योजनेत अर्ज दाखल केलेल्या शेतकऱ्यांना आता कार्यारंभ आदेशाची प्रतीक्षा आहे. मात्र, त्यासाठी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या निवड समितीची मंजुरी अत्यावश्यक आहे. ‘‘ऑनलाइन अर्ज आता निवड समितीकडे जातील. राज्यातील निवड समित्यांकडून पुढील काही दिवसात अंतिम निवड यादी निश्चित केली जाईल,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

‘‘समित्यांची मान्यता मिळताच शेतकऱ्यांना अनुदानासाठी निवड झाल्याचे पत्र कृषी खात्यामार्फत पाठविले जाणार आहे. कार्यारंभ पत्र हाती येताच ३० दिवसांत विहीर खोदाईला सुरवात करावी लागेल. विहीर खोदाईची कामे ३१ मार्चअखेर पूर्ण करावी लागतील. मात्र, काम जसे पूर्ण होईल त्याप्रमाणात अनुदानाच्या रकमा शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होतील,’’ असेही कृषी विभागातून सांगण्यात आले. 

अशी आहेत योजनेची वैशिष्ट्ये 

  • पंचायत समित्यांकडून होणारी वशिलेबाजी थांबविण्यासाठी यंदा राज्यभर ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. 
  • ऑनलाइन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ५३ हजार शेतकऱ्यांनी भरले अर्ज 
  • अनुसूचित जातीच्या ४८२३ शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून आणि अनुसूचित जमातीच्या ३५६७ शेतकऱ्यांना सुधारित आदिवासी योजनेतून विहीर खोदाईसाठी अडीच लाख रुपये अनुदान मिळणार 
  • विहिरीसाठी अडीच लाख रुपये मिळतीलच याशिवाय वीज कनेक्शन, वीज पंप, ठिबक किंवा तुषार संचासाठी असे एकूण तीन लाख ३५ हजार रुपये मिळतील.  
  • आधीची विहीर असल्यास दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये मिळतील. याशिवाय वीज कनेक्शनला दहा हजार, वीज पंप २५ हजार, ठिबक संचाला ५० हजार रुपये मिळणार 
  •  विहीर नको असल्यास पण मागेल त्याला शेततळे योजनेतून तळ्याची खोदाई केलेली असल्यास प्लास्टिक पेपरसाठी एक लाखाचे अनुदान मिळेल. तसेच वीज कनेक्शनला दहा हजार, वीज पंप २५ हजार, ठिबक संचाला ५० हजार रुपये दिले जातील.

इतर अॅग्रो विशेष
साखर उद्योगासाठी तातडीने प्रयत्न करा :...नवी दिल्ली : अडचणीतल्या साखर उद्योगाला तातडीने...
आदेश पोचले, खरेदी ठप्पच !औरंगाबाद : तूर खरेदीसाठीच्या मुदतवाढीचे आदेश अखेर...
कच्च्या जूटला ३७०० रुपये हमीभावनवी दिल्ली ः कच्च्या जूटच्या हमीभाव वाढीला...
सोलापूर दूध संघाला सहा कोटींचा तोटासोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
जालन्यातील रेशीम कोष खरेदी थांबलीजालना : येथील प्रायोगिक तत्त्वावरील रेशीम कोष...
वेंगुर्ला तालुक्यातील गावांनी जपलाय...सह्याद्रीच्या कडेकपारीत शेकडो वैशिष्ट्यपूर्ण व...
राज्यात ११ ठिकाणी पारा ४२ अंशांवरपुणे : विदर्भ उन्हात होरपळत असतानाच मध्य...
नागरी सेवा मंडळाच्या ‘क्लोन’मुळे...पुणे : कृषी विभागातील बदल्यांमागे घडणाऱ्या खऱ्या...
महाराष्ट्र सर्वाधिक उष्ण राज्यपुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने देशात महाराष्ट्र...
रब्बीतील आठ तालुक्यात मध्यम दुष्काळ...मुंबई : राज्य सरकारने रब्बी २०१७ -१८ च्या...
शेतकरी, साखर कारखान्यांनी रस्त्यावर...सातारा : केंद्र आणि राज्य सरकार यांचा साखर...
दूधप्रश्नावरील आंदोलनाच्या समन्वयासाठी...नगर : दर मिळत नसल्याने मोफत दूध देऊन आंदोलन...
साखर खरेदी, निर्यात अनुदानावर लवकरच...पुणे : साखर कारखान्यांना मदतीची भूमिका राज्य...
उसाचा तब्बल ११ वा खोडवा !!खेड (ता. कर्जत, जि. नगर) येथील उदयसिंह हिंदूराव...
इंधनाचा भडकाएप्रिल महिन्यात राज्यातील तापमान ४० अंश...
हमीभावाने खरेदीत हवी विश्वासार्हताशासनाची कार्यक्षमता व पारदर्शकता वाढविण्याच्या...
उन्हामुळे लाही लाहीपुणे : वाढलेल्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत...
साखरेवर कर, इथेनॉलवरील जीएसटी कमी...नवी दिल्ली ः देशात सध्या साखरेचे दर पडल्याने...
तूर खरेदीत राज्याला एक हजार कोटींचा...मुंबई ः अगदी सुरवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात...
व्यावसायिक पिकांसह ‘हायटेक’ फुलशेतीचा...डोंगरकडा (जि. हिंगोली) येथील नागेश खांडरे या कृषी...