agriculture news in Marathi, benefit of jalyukt for two two lac 70 thousand heacter, Maharashtra | Agrowon

पावणेतीन लाख हेक्‍टरला ‘जलयुक्त’चा फायदा
सूर्यकांत नेटके
सोमवार, 30 एप्रिल 2018

नगर ः जलयुक्त शिवार अभियानातून गेल्या दोन वर्षात झालेल्या कामामुळे नगर जिल्ह्यामध्ये सुमारे दोन लाख सत्तर हजार हेक्‍टर क्षेत्राला लाभ देण्याएवढे जास्तीचे पाणी उपलब्ध झाले आहे. दोन वर्षात २४ हजार ५७१ कामे पूर्ण झाली असून, त्यावर तब्बल पावणेचारशे कोटी रुपये खर्च झाले आहेत. जलयुक्तमुळे पाणी साठा वाढला असल्याचे जिल्हा प्रशासन सांगत आहे.

नगर ः जलयुक्त शिवार अभियानातून गेल्या दोन वर्षात झालेल्या कामामुळे नगर जिल्ह्यामध्ये सुमारे दोन लाख सत्तर हजार हेक्‍टर क्षेत्राला लाभ देण्याएवढे जास्तीचे पाणी उपलब्ध झाले आहे. दोन वर्षात २४ हजार ५७१ कामे पूर्ण झाली असून, त्यावर तब्बल पावणेचारशे कोटी रुपये खर्च झाले आहेत. जलयुक्तमुळे पाणी साठा वाढला असल्याचे जिल्हा प्रशासन सांगत आहे.

टंचाईशी सामना करणाऱ्या गावांत शाश्‍वत पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने तीन वर्षापासून सिंचनाशी सबंधित विविध योजना एकत्र करून "जलयुक्त शिवार अभियान'' सुरू केले. सातत्याने टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासह दुष्काळाशी सामना करणाऱ्या गावांची या योजनेसाठी निवड केली. क्षेत्रफळाने मोठा असलेल्या आणि गावांची संख्याही अधिक असलेल्या नगर जिल्ह्यामध्ये पहिल्या वर्षी २७९, दुसऱ्या वर्षी २६८, तिसऱ्या २४१ गावांची निवड केली. मंजुरीनंतर दोन वर्षे काम पूर्ण करण्याचा नियम असल्याने आतापर्यंत पहिल्या दोन वर्षात निवडलेल्या गावांतील कामे पूर्ण करण्यावर भर दिला आहे. 

पहिल्या वर्षीच्या सगळ्या गावांतील (२०१५-१६) सर्व १४ हजार ६४८ कामे पूर्ण झालेली असून त्यावर २०६ कोटी ७९ लाख रुपये खर्च झाले आहेत. दुसऱ्या वर्षीची (२०१६-१७) कामे पूर्ण करण्यावर प्रशासनाने भर दिला. त्यावर्षी ९ हजार नऊशे तेवीस कामे मंजूर झाली होती. या मार्च अखेरपर्यंत त्यातील ४० कामे शिल्लक होती. ती पूर्ण करण्याला मुदतवाढ मिळाली आहे.

दुसऱ्या वर्षाच्या कामांवर १६८ कोटी ३२ लाख रुपये खर्च झाले आहेत. अभियानात तिसऱ्या वर्षी (२०१७-१८) २४१ गावे निवडलेली असून साडेआठ हजार कामे मंजूर आहेत. त्या कामाला मात्र अजून गती आलेली नाही. यंदा (२०१८-१९) चौथ्या वर्षी अपात्र गावे वगळता सर्व राहिलेली २४८ गावे अभियानात निवडली आहेत. अभियानातून कामे करतानाच लोकसहभाग वाढीवरही नूतन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी भर दिला आहे. 

पहिल्या दोन वर्षात झालेल्या कामांमुळे १ लाख ३९ हजार ७२५ टीसीएम पाणी उपलब्ध झाल्याने चब्बल एक लाख सत्तर हजार हेक्‍टरला फायदा झाला आहे. जलयुक्तच्या कामांमुळे पाणी टंचाईची तीव्रताही अत्यंत कमी आहे. कोपरगाव, राहाता, राहुरीसह दुष्काळी पारनेर, शेवगाव, पाथर्डी, जामखेड, श्रीगोंदा, कर्जत भागातही काही ठिकाणी उन्हाळी पिके घेतली आहेत. दोन वर्षात सतराशे तलावातील गाळ काढला असून त्यातून सात हजार पाचशे ४२ टीसीएम अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले असल्याचे सांगण्यात आले.

इतर अॅग्रो विशेष
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...