agriculture news in Marathi, benefit of loan waiver deposit process started, Maharashtra | Agrowon

कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू
राजकुमार चौगुले
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर: कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शासनाने पात्र शेतकऱ्यांची यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालय व जिल्हा बॅंकांकडून मागविली आहे. यामुळे सोमवार(ता. २३)पासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा होण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यातून २ लाख ७० हजार ५९० शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी अर्ज आले अाहेत. या अर्जांपैकी १७ हजार ६२० शेतकऱ्यांना अपात्र ठरविले अाहे. 

कोल्हापूर: कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शासनाने पात्र शेतकऱ्यांची यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालय व जिल्हा बॅंकांकडून मागविली आहे. यामुळे सोमवार(ता. २३)पासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा होण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यातून २ लाख ७० हजार ५९० शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी अर्ज आले अाहेत. या अर्जांपैकी १७ हजार ६२० शेतकऱ्यांना अपात्र ठरविले अाहे. 

कर्जमाफीचा २ लाख ५२ हजार ९७० शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. जिल्हा बॅंकांत ५३ हजार २६२ थकबाकीदार आहेत. २२३ कोटी १७ लाखांची थकबाकीची रक्कम आहे. राष्ट्रीयीकृत, खासगी, ग्रामीण बॅंकांमधील ५४ हजार ७२९ थकबाकीदार आहेत. याचे ६५ कोटी १३ लाख रुपये थकीत आहेत. दरम्यान, कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील एकूण १ हजार ८४७ विकास कार्यकारी सहकारी संस्थांमधील २ लाख ५२ हजार ९७० सभासदांना मिळणार आहे.

शासनाने केलेल्या छाननीत कोल्हापुरातील १७ हजार ६२० शेतकरी कर्जमाफीला अपात्र ठरले. अपात्र ठरलेल्यांची यादी वगळून टप्प्याटप्प्याने पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जात आहे. त्याच यादीनुसार कर्जमाफीची रक्कम खात्यावर जमा केली जाईल. दरम्यान, पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या यादीची बॅंक व शाखानिहाय फोड करून ही रक्कम ज्या त्या शेतकऱ्याच्या नावावर जमा केली जाणार अाहे. दरम्यान, ही यादी पाठविण्यासाठी संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सुटीदिवशीही कार्यालयात हजेरी लावून ही प्रक्रिया पूर्ण करण्याला प्राधान्य दिले आहे. यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांना या रक्कमेचा लाभ मिळू शकेल, अशी शक्‍यता उपनिबंधक कार्यालयातील सूत्रांनी व्यक्त केली. 

ऊस उत्पादक शेतकऱ्यांत नाराजीचा सूर 
शासनाने पहिल्या टप्प्यातील काही शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. मात्र यामध्ये अद्याप काही ग्रामपंचायतींची नावे या यादीत नाहीत. अनेक गावांमध्ये पाच ते दहा शेतकरी इतक्‍या नगण्य शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांतून कर्जमाफीबाबत फारसे समाधान नसल्याचे सध्याचे तरी चित्र आहे. कर्जमाफीच्या कालावधीच्या निकषात बसत नसल्याने अनेक ऊस उत्पादकांनाही याचा लाभ मिळाला नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे.

इतर ताज्या घडामोडी
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी...बुलडाणा ः येत्या हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाने...
सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने...सांगली : जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा संपला...
जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे...जळगाव  ः खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून...
आषाढी वारीत शासकीय महापूजेचा वेळ...सोलापूर : आषाढी एकादशी दिवशीची श्री विठ्ठल-रुक्‍...
जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुलावरून...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
वऱ्हाडात महाबीज बियाणे मिळण्यापूर्वी...अकोला ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम व ग्राम...
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात...सातारा  : टेंभू उपसा सिंचन योजनेतून खटाव...
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात...मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९८...
पाऊस लांबल्याने आता कोणते पीक घ्यावे?...नगर : मॉन्सून लांबल्याने आता खरीप पिकांत बदल...