agriculture news in marathi, The benefits of the disease scheme for one lakh families | Agrowon

हिंगोली जिल्ह्यात एक लाख कुटुंबांना अारोग्य योजनेचा लाभ
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

हिंगोली ः केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत-पंतप्रधान जनआरोग्य योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ७ हजार २८ कुटुंबांना मोफत उपचाराचा लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.

हिंगोली ः केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत-पंतप्रधान जनआरोग्य योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ७ हजार २८ कुटुंबांना मोफत उपचाराचा लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील डी. पी. सी. सभागृहात आयोजित ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा प्रारंभ पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते झाला, या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार डॉ. संतोष टारफे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अनिल पतंगे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. कांबळे पुढे म्हणाले की, आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेसोबतच राज्य शासनाची ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ ही एकत्रितपणे राबविण्यात येणार आहे. आयुष्यमान जनआरोग्य योजनेअंतर्गत १ हजार ३०० हून अधिक गंभीर आजारांवर लाभार्थ्यांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार देण्यात येणार आहे. देशातील कोणत्याही शासकीय किंवा मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये करता येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांना देखील सहभागी करून घेतले जाणार असून हेल्थ ॲण्ड वेलनेस सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

श्री. भंडारी म्हणाले की, आयुष्मान जनआरोग्य योजनेंतर्गत २०११ च्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेनुसार कुटुंबांची निवड करण्यात आली आहे. अधिक माहितीकरिता १४५५५ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. याकरिता आता लाभार्थ्यांना शिधापत्रिका किंवा कोणत्याही ओळखपत्राची आवश्यकता लागणार नाही. आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यातील ११७ लाभार्थ्यांची या योजनेअंतर्गत नोंद झाली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पहिले ई-कार्ड हे हिंगोली जिल्ह्यात तयार झाल्याची माहिती डॉ. श्रीवास यांनी प्रास्ताविकात दिली. या वेळी आयुष्यमान भारत योजनेसोबतच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना एकत्रितरीत्या राबविल्या जाणाऱ्या या योजनेचा या वेळी निवडक लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ‘ई-कार्ड’चे वाटप करण्यात आले.

इतर बातम्या
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...
रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...
काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा...मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारीमुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
पुणे विभागात हरभरा, गव्हाची काढणी...पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने रब्बी हंगामातील गहू...
पूर्व भागात कृष्णा, वारणा नद्या पडल्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पूर्व भागात कृष्णा व...
ताकारीच्या तिजोरीत १३ कोटी शिल्लकवांगी, जि. सांगली ः मागील १५ वर्षांपासून दरवर्षी...
गिरणा नदीतून पाण्याची ग्रामस्थांना...जळगाव ः पिण्याच्या पाण्यासंबंधी सोडलेले गिरणा...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...