agriculture news in Marathi, betelwine producers in trouble, Maharashtra | Agrowon

नागवेलीचा खर्च निघणे झाले मुश्‍कील
टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 जानेवारी 2018

गेल्या तीन महिन्यांपासून पानाचे दर कमी आहेत. पानांची मागणीही कमी झाली आहे. त्यामुळे मळ्याचा खर्चही निघेणा अशी अवस्था झाली आहे.
- पोपट जाधव, पान उत्पादन शेतकरी, एरंडोली, ता. मिरज.

सांगली ः सांगली पूर्व भागातील मालगाव, बेडग, नरवाड ही गावे पानमळ्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. हा भाग पानमळ्याचे आगार मानले जाते. गेल्या तीन महिन्यांपासून पानाचे दर कमी झाल्याने पान उत्पादक शेतकरी संकटात असून नागवेलीचा खर्चही मिळणे मुश्‍कील झाले आहे. 

मिरज पूर्व भागातील बागायती शेतीचा एकेकाळी "ब्रॅंड'' ठरलेली पानमळा शेती दिवसेंदिवस अस्तंगत होत आहे. चव आणि दर्जासाठी पूर्व भागाने राज्यभरातील पानबाजारांत ठसा उमटवला आहे. विशेषतः मालगाव, बेडग, आरग, नरवाड, भोसे, म्हैसाळ या गावांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली.

मालगावसारख्या गावाने कधीकाळी मुंबईच्या पानबाजाराची सूत्रे येथूनच हलवली. पानमळ्याच्या शेतीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी पानमळ्याखाली ८०० ते ९०० एकर क्षेत्र होते. आज ही शेती २०० ते २५०  एकरांवर आली आहे. 

मागील चार वर्षांत पानाला चांगला भाव मिळाला. गेल्या वर्षी पानांना दोन हजार रुपये प्रतिडागास (एक डाग म्हणजे तीन हजार पाने) असा मिळाला होता. या वर्षी ३०० ते ६०० रुपये प्रतिडाग (एक डाग म्हणजे तीन हजार पाने) मिळत आहे. या भागात तीन कळी, फाफडा, हक्कल प्रकारच्या पानांची लागवड होते, परंतु वाढत्या खर्चामुळे पानमळ्याचे क्षेत्र घटले आहे. पानमळ्यात कुशल कामगार काम करण्यासाठी मिळत नाहीत. पानखुडणीसाठी जुने जाणते लोक जात आहेत. मात्र, कुशल कारागिरांची संख्या कमी असल्याने मजुरीत वाढ झाली आहे. त्यामुळे पानांची वेळेत काढणी होत नाही. याचाही फटका शेतील बसतो आहे. 

पानाचे दर
कळी    ३०० ते ४०० रुपये ३००० पाने
हक्कल (मध्यम)    १०० ते १५० रुपये ३००० पाने
फापडा    ५०० ते ६०० रुपये ३००० पाने

इतर अॅग्रो विशेष
कोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...
कमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
होय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...
‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...
नाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...
अठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...
‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...
सिंचन योजनांचे अर्थसाह्य महामंडळाच्या...मुंबई : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील...
मुरघास : चाराटंचाईवर उत्तम पर्यायउन्हाळ्यामध्ये किंवा चारा तुटीच्या काळात...
बाजारात टंचाईमुळे ‘पांढऱ्या सोन्या'च्या...जळगाव ः देशात कापसाची सर्वाधिक सुमारे ४० लाख हेक्...
दिवसा वीजपुरवठ्याचे स्वप्न प्रत्यक्षात...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी पंप...
विजयादशमीनिमित्त फुलांना मागणी वाढलीपुणे ः गुरुवारी (ता. १८) साजऱ्या हाेणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची...पुणे: राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू...
मराठवाड्यात यंदा शेतकऱ्यांचे...औरंगाबाद : कमी पाऊस आणि मोठा खंड यामुळे...
ऊर्जा विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांना...मुंबई  : ऊर्जा विभागाने लोकहिताच्या व...
राज्यात २७ लाख हेक्टरवर होणार ज्वारी...पुणे : केंद्र सरकारच्या नव्या धोरणाप्रमाणे...
सणासुदीत अर्थकारण उंचावणारे पेरीडकरांचे...गणपती उत्सवापासून ते अगदी दसरा, दिवाळीस तुळशीच्या...