agriculture news in marathi, BG 3 sale without license should be banned, pandurang fundkar, mumbai | Agrowon

बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर प्रतिबंध आणावेत : फुंडकर
विजय गायकवाड
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

या तणनाशक सहनशील बियाण्यांची सामाजिक, शारीरिक व कृषी क्षेत्रावर होणाऱ्या दुष्परिणामांचा अभ्यास न करता विक्री होत आहे, ही गंभीर बाब अाहे.
- पांडुरंग फुंडकर, कृषिमंत्री

मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट) असल्याचे सांगून बीजी ३ च्या नावाने विविध कंपन्या राज्यात कापूस बियाण्यांची विनापरवाना विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर तातडीने प्रतिबंध करण्यासाठी राज्यातील बायोटेक्नॉलॉजिस्ट (जैवतंत्रज्ञ) समन्वय समितीची बैठक घेण्याचे निर्देश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले आहेत.

देशात बीजी १ आणि बीजी २ या प्रमाणित बियाण्यांच्या विक्रीसाठी केंद्र शासनाने परवानगी दिलेली आहे. मात्र काही कंपन्या वेगवेगळे ब्रॅंडनेम वापरून तणनाशक गुणधर्म असलेले बीजी ३ कापसाचे बियाणे परवाना नसताना विक्री करीत आहेत. महाराष्ट्राबरोबरच गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा यांसारख्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये अशा प्रकारची विक्री होत आहे.

केंद्रीय कापूस संशोधन केंद्राने काही नमुने तपासल्यावर ते पॉझिटिव्ह आढळून आले आहे. याबाबतची माहिती घेऊन अशा विनापरवाना बियाणे विक्रीवर तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी बैठक घ्यावी. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या राज्यस्तरीय बायोटेक्नॉलॉजी समन्वय समितीची बैठक तातडीने आयोजित करावी, असे निर्देश कृषिमंत्र्यांनी विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत.

 

इतर अॅग्रो विशेष
झळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...
पाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...
नाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...
कृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...
भाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...
ग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...
शेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...
कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...
‘एमएसीपी’चे फलित काय ?पुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...
एकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...
स्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...
केरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...
वानरांचा बंदोबस्त करणार कसा? माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...
योजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...
क्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन...
‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...
मॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...
मराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...
वर्धा जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी...