agriculture news in marathi, Bhama Askhed Dam work will be completed before December 2019 | Agrowon

भामा आसखेडचे काम डिसेंबरअखेर पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

पुणे : महापालिका, जिल्हा प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक चर्चा झाल्याने रखडलेल्या भामा आसखेड प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, येत्या डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्याबाबत संबंधित ठेकेदाराला सूचना करण्यात आली आहे. तसेच, कामात अडथळे येऊ नयेत, यासाठी राज्य राखीव दलाचे पथक नेमण्यात आले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

पुणे : महापालिका, जिल्हा प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक चर्चा झाल्याने रखडलेल्या भामा आसखेड प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, येत्या डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्याबाबत संबंधित ठेकेदाराला सूचना करण्यात आली आहे. तसेच, कामात अडथळे येऊ नयेत, यासाठी राज्य राखीव दलाचे पथक नेमण्यात आले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी आखलेल्या भामा आसखेड प्रकल्पाचे बंद पडलेले काम आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे. गेल्या वर्षी हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे ते थांबले होते.

राज्य सरकारच्या पातळीवर दोनदा चर्चा होऊनही शेतकऱ्यांनी जलवाहिनी आणि जॅकवेलचे काम रोखले होते. राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणा मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी दहा दिवसांपूर्वी पुन्हा आंदोलन केले होते. मात्र, महापालिका आयुक्त सौरभ राव आणि आंदोलनकर्त्यांच्या बैठकीनंतर जलवाहिनीचे काम सुरू आहे.

या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांच्यासह अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या कामांची शुक्रवारी पाहणी केली. तेव्हा जलवाहिनी, जॅकवेलच्या कामासह संभाव्य अडचणी आणि त्यावरील उपायांचा आढावा घेण्यात आला. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांशीही त्यांनी चर्चा केल्याचे सांगण्यात आले. 

उगले म्हणाल्या, ''जलवाहिनी आणि धरणाच्या परिसरातील जॅकवेलचे बहुतांश काम झाले आहे. उर्वरित कामे वेळेत करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत. ज्यामुळे पावसाळा सुरू होण्याआधी कामे पूर्ण होणार आहेत. या प्रकल्पांतर्गत कामांना मुदतवाढ देण्यात आली असून, त्यानुसार ती डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण करण्यात येतील. दरम्यानच्या काळात, शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढला जाईल.'' 

दीड महिन्यात काम पूर्णत्वाकडे 
भामा आसखेड धरण परिसरातील जॅकवेलचे (पंपिंग हाउस) काम आता सुरू झाले असले, तरी प्रत्यक्ष काम सुरू असलेल्या भागात पाणी साचत असल्याने त्यात अडथळे येत आहेत. दुसरीकडे, पावसाळ्यात हे काम करणे शक्‍य नसल्याने ते वेळेत करण्याचा प्रयत्न असल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील दीड महिन्यात बहुतांश काम पूर्ण केले जाईल, असेही सांगण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...