agriculture news in Marathi, Bhamdev villege visit by UNDP program Manager Mr. sodhi, Maharashtra | Agrowon

संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे सोधी यांनी घेतला भामदेवीचा आढावा
गोपाल हागे
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

वाशीम : संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे (यूएनडीपी) कार्यक्रम व्यवस्थापक प्रभज्योसिंग सोधी यांनी कारंजालाड तालुक्यातील भामदेवी गावाला भेट दिली. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री साह्यता निधीतून गावात झालेल्या कामांची माहिती घेतली.

याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, कारंजा लाडचे उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तहसीलदार सचिन पाटील, ‘संवर्धन’ संस्थेचे डॉ. नीलेश हेडा, सरपंच सुभाष मोहकर आदी उपस्थित होते.

वाशीम : संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे (यूएनडीपी) कार्यक्रम व्यवस्थापक प्रभज्योसिंग सोधी यांनी कारंजालाड तालुक्यातील भामदेवी गावाला भेट दिली. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री साह्यता निधीतून गावात झालेल्या कामांची माहिती घेतली.

याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, कारंजा लाडचे उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तहसीलदार सचिन पाटील, ‘संवर्धन’ संस्थेचे डॉ. नीलेश हेडा, सरपंच सुभाष मोहकर आदी उपस्थित होते.

श्री. सोधी यांनी भामदेवी येथे सुरू करण्यात आलेल्या सहकारी तत्त्वावरील दूध डेअरीला सर्वप्रथम भेट दिली. या ठिकाणी एक हजार लिटर क्षमतेचे दुग्ध प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे. गावातून तसेच आजूबाजूच्या परिसरातून रोज सहाशे ते सातशे लिटर दूध संकलित करून त्यावर प्रक्रिया करणे, विविध पदार्थ बनविण्याचे काम डेअरीमार्फत सुरू आहे. पाश्चराइज्ड दूध व दुग्धजन्य पदार्थांची “वऱ्हाड दूध’ या नावाने विक्री करण्यात येत आहे. त्याला ग्राहकांमधून वाढती मागणी असल्याचे सरपंच श्री. मोहकर व ग्रामस्थांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री साह्यता निधीमधून जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली गावात झालेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली.

श्री. सोधी यांनी डेअरीच्या माध्यमातून गावामध्ये सुरू असलेल्या दुग्ध व्यवसायाची माहिती घेतली. तसेच या उपक्रमाबद्दल द्विवेदी व भामदेवीमधील ग्रामस्थांचे कौतुक केले. तसेच संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली. दुधाप्रमाणे शेतीमालप्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही केले. यूएनडीपी अंतर्गत दिल्ली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या प्रदर्शनात भामदेवीतील दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. सोधी यांनी सांगितले.

श्री. सोधी यांनी वृक्षारोपण, जलसंधारणाची कामे, मत्स्यपालन आदी कामांनाही भेट देऊन पाहणी केली. 

इतर ताज्या घडामोडी
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...
सातारा जिल्ह्यातील पश्‍चिम भागात दमदार...सातारा : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील महाबळेश्वर,...
कोल्हापुरात पंधरा लाख लिटर दुधाचे संकलन...कोल्हापूर ः गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये...
बीड जिल्ह्यात दुधाचे संकलन ठप्पबीड : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...