agriculture news in marathi, Bhanwala says, 65 crore rupees for irrigation project, Maharashtra | Agrowon

सिंचन प्रकल्पांसाठी ६५ हजार कोटी : भानवाला
वृत्तसेवा
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

केंद्राने प्रस्तावित केलेले सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या आर्थिक सुविधा उपलब्ध आहेत. राज्य सरकार त्यांच्या वाट्याचा निधी कधी उपलब्ध करून देते आणि केंद्रीय पाणी संसाधन मंत्रालयाची यामधील सक्रिय भूमिका यावर हे प्रकल्प कधी पूर्ण होतील हे अवलंबून आहे. सध्या १८ प्रकल्प पूर्ण झाले असून, सात प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
- एच. के. भानवाला, अध्यक्ष, ‘नाबार्ड’

नवी दिल्ली ः देशातील सिंचन प्रकल्पांचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅंकेने (नाबार्ड) पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत महत्त्वाच्या ९३ सिंचन प्रकल्पांसाठी ६५ हजार ६३५ कोटी रुपयांची कर्जे उपलब्ध करून दिली आहेत. या निधीच्या माध्यमातून प्रकल्पांचा विकास करून सिंचन सुविधा वाढविण्याचा उद्देश आहे, असे ‘नाबार्ड’चे अध्यक्ष एच. के. भानवाला यांनी सांगितले. 

देशातील ९९ सिंचन प्रकल्पांचा विकास करण्यासाठी ‘नाबार्ड’मार्फत दीर्घकालीन कर्जे उपलब्ध करून देण्यात येत आहे. यात केंद्र आणि राज्यांच्या हिस्सा समाविष्ट असतो. हे प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण करण्यासाठी ७० हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
‘नाबार्ड’ त्यादृष्टीने कर्जे उपलब्ध करून देत आहे.
 
‘‘ केंद्राने प्रस्तावित केलेले सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या आर्थिक सुविधा उपलब्ध आहेत. या कामात सध्या प्रगती आहे. राज्य सरकार त्यांच्या वाट्याचा निधी कधी उपलब्ध करून देते आणि केंद्रीय जल संसाधन मंत्रालयाची यामधील सक्रिय भूमिका, यावर हे प्रकल्प कधी पूर्ण होतील हे अवलंबून आहे. सध्या १८ प्रकल्प पूर्ण झाले असून सात प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. हे सिंचन प्रकल्प राज्य सरकारांकडून पूर्ण करण्यात येत आहेत. अनेक प्रकल्पांसाठीचा केंद्राचा हिस्सा उपलब्ध झाला आहे. परंतु, राज्यांचा हिस्सा मिळण्यात वेळ लागत आहे. त्यामुळे काम पाहिजे त्या प्रमाणात प्रगतीपथावर नाही,’’ असेही भानवाला म्हणाले. 

सर्वाधिक प्रकल्प उत्तर प्रदेशातील
भानवाला म्हणाले, की निधी मिळालेले सर्वाधिक प्रकल्प उत्तर प्रदेशातील आहेत. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने अर्थसंकल्पात सात हजार कोटींची तरतूद करणे आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्र, तेलंगणा आणि मध्य प्रदेशात मोठे सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. केंद्राने मंजूर केलेले ९९ सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यास देशातील जवळपास ८० लाख हेक्टरवरील क्षेत्रावर सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे. 

निधी उपलब्ध
‘नाबार्ड’ने ९९ पैकी ९३ सिंचन प्रकल्पांसाठी ६५ हजार ६३४.९३ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यापैकी ८६ प्रकल्पांसाठी जवळपास २३ हजार ४०२.७२ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. यामध्ये केंद्राचा हिस्सा १५ हजार २४२ कोटी रुपये आहे आणि राज्यांचा हिस्सा ८ हजार १६०.७० कोटी रुपये आहे. हे ९३ प्रकल्प लवकर पूर्ण व्हावेत, यासाठी हा निधी वेळेत उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

इतर अॅग्रो विशेष
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...