agriculture news in marathi, Bhartiya Janata party concentrate on Vidharbha | Agrowon

विदर्भाचा गड राखण्यासाठी भाजपच्या हालचाली
विनोद इंगोले
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

नागपूर : विदर्भात आपला पाया भक्‍कम करावा, त्यासोबतच भाजपचा हा परंपरागत गड येत्या निवडणुकांमध्येही राखता यावा, याकरिता कामाला लागलेल्या मुख्यमंत्र्यांनी भंडारा-गोंदिया, त्यानंतर पूर्व व पश्‍चिम विदर्भातील लोकप्रतिनिधींशी रामगिरीवर संवाद साधला. मार्चपर्यंत विकासकामांवरील निधी खर्च करण्याच्या सूचना देत आपले शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यावर भर देण्याचा सल्ला त्यांनी या बैठकीत दिल्याचे सूत्रांनी सांगितले. 

नागपूर : विदर्भात आपला पाया भक्‍कम करावा, त्यासोबतच भाजपचा हा परंपरागत गड येत्या निवडणुकांमध्येही राखता यावा, याकरिता कामाला लागलेल्या मुख्यमंत्र्यांनी भंडारा-गोंदिया, त्यानंतर पूर्व व पश्‍चिम विदर्भातील लोकप्रतिनिधींशी रामगिरीवर संवाद साधला. मार्चपर्यंत विकासकामांवरील निधी खर्च करण्याच्या सूचना देत आपले शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यावर भर देण्याचा सल्ला त्यांनी या बैठकीत दिल्याचे सूत्रांनी सांगितले. 

कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विदर्भातील नेत्यांकडून या भागातील जनतेच्या विकासात्मक कामांची अपेक्षापूर्ती झाली नाही. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी संस्थानिक असल्यागत केवळ शाळा, महाविद्यालय उघडून आपल्या कुटुंबाच्या पोटापाण्याचा प्रश्‍न मार्गी लावण्याचे काम सत्ता असताना केले. सिंचन सुविधा बळकटीकरणाकडेदेखील या नेत्यांनी दुर्लक्ष केल्याने सिंचनाचा अनुशेष या भागात वाढला. त्यामुळे या भागातील जनतेचा त्यांच्यावरील विश्‍वास उडाला व ही मते भाजपकडे वळती झाली. गेल्या अनेक वर्षांत भाजप-शिवसेनेलाच या भागातील जनतेने स्वीकारल्याचे चित्र आहे. ही गठ्ठा मते येत्या दीड वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकांमध्येदेखील भाजपलाच मिळावीत, याकरिता मुख्यमंत्री आतापासूनच मोर्चेबांधणीला लागले आहेत. त्यानुसार त्यांनी नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्‍त झालेली जागा राखता यावी, याकरिता भंडारा-गोंदियात बैठक घेतली. त्यानंतर पूर्व विदर्भातील आमदार, नगराध्यक्ष यांच्याशी संवाद साधल्यानंतर पश्‍चिम विदर्भातील आमदार, तसेच नगराध्यक्षांशी त्यांनी संवाद साधला. 

शासनाने पैसे देऊनही ते खर्च न करू शकलेल्या नगरपालिकांवर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्‍त केल्याचे सूत्रांनी सांगितले. मार्चपर्यंत पैसे खर्च न झाल्यास ते शासनाकडे परत येतील. पुन्हा याच मुद्द्यावरून ओरड सुरू होईल. त्यामुळे विकासकामांना गती देत आपले गाव, शहर स्वच्छ व सुंदर असावे, यावर भर देण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिला.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...