भाऊसाहेबांना भारतरत्न मिळायलाच हवा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पापळ, जि. अमरावती : भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथे त्यांच्या ११९व्या जयंतीनिमित्त माजी कृषीमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.    तत्पुर्वी भाऊसाहेबांना भारतरत्न मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत चिमुकल्यांनी गावात शोभायात्रा काढली. यानिमित्ताने डॉ. पंजाबराव देशमुख हायस्कूलच्या वतीने रोगनिदान आणि रक्तदान शिबिराचे, तर नेहरू युवा मंडळाच्या वतीने कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.

'माझ गाव'च्या वतीने स्मारक चौकात गावातील विविध क्षेत्रांत कार्यरत असणारे युवक तसेच प्रगतीशिल शेतकरी यांचा सन्मान  करण्यात आला.

या वेळी जिल्हा परिषद शाळा व डॉ. पंजाबराव देशमुख विद्यालयाच्या वतीने रॅली काढण्यात आली. यामध्ये विविध वेशभूषा परिधान करून विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यानंतर स्मारक चौकात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला गावातील नागरिक आणि शाळेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.   या वेळी पापळ येथील सरपंच विजय अजबले, युवक संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख, माजी सरपंच किशोरपंत गुलालकरी, सुनील देशमुख, नाना पाटील वानखेडे, मारोतराव काजे, प्राचार्य पी. पी. चौधरी यांची उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com