agriculture news in marathi, BhelBhatta Cluster to form in Chandwad, Nashik | Agrowon

चांदवडला होणार ‘भेळभत्ता क्लस्टर’ !
टीम अॅग्रोवन
शनिवार, 3 मार्च 2018

नाशिक : नाशिकच्या चिवड्याने अनेकांना भुरळ घातल्यानंतर आता चांदवडला भेळभत्त्याचे क्लस्टर होणार आहे. भेळभत्त्याचे ब्रँडिंग करून त्याची राज्यभर विक्री करण्यासाठी हे क्लस्टर बनविण्यात येणार आहे. त्यासाठी १३१ पेक्षा अधिक भेळभत्ता व्यापाऱ्यांना एकत्र करून रेणुका भेळभत्ता क्लस्टर कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या क्लस्टरचा डीपीआरही तयार करण्यात आला असून, आता तो मंजुरीच्या अखेरच्या टप्प्यात आहे.

नाशिक : नाशिकच्या चिवड्याने अनेकांना भुरळ घातल्यानंतर आता चांदवडला भेळभत्त्याचे क्लस्टर होणार आहे. भेळभत्त्याचे ब्रँडिंग करून त्याची राज्यभर विक्री करण्यासाठी हे क्लस्टर बनविण्यात येणार आहे. त्यासाठी १३१ पेक्षा अधिक भेळभत्ता व्यापाऱ्यांना एकत्र करून रेणुका भेळभत्ता क्लस्टर कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या क्लस्टरचा डीपीआरही तयार करण्यात आला असून, आता तो मंजुरीच्या अखेरच्या टप्प्यात आहे.

उद्योगांना सामूहिक सोयी-सुविधा त्यांच्या गरजेनुसार एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार अनेक उद्योगांच्या क्लस्टरसाठी मदत करते. केंद्र सरकारसारखीच राज्य सरकारने यासाठी आपली योजना तयार केली असून, त्यासाठी पाच कोटींपर्यंत निधी दिला जातो. त्यात २० टक्के निधी हा विशेष हेतू वाहन (एसपीव्ही) कंपनीने टाकायचा असतो. त्याचप्रमाणे जागाही कंपनीने उपलब्ध करून द्यायची असते. चांदवड येथे भेळभत्ता व्यापाऱ्यांना एकत्र करून हे क्लस्टर सुरू करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी भेळभत्ता प्रसिद्ध आहे; पण उर्वरित महाराष्ट्रात भत्ता हा प्रकार फारसा माहीत नाही. त्यामुळे त्याचे आधुनिक पद्धतीने पॅकेजिंग करून त्यात नवीन तंत्रज्ञानाचे या क्लस्टरच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना मिळणार आहे.
राज्य सरकारने डीडी प्लस, विनाउद्योग व नक्षलग्रस्त भागासाठी अशा क्लस्टरची योजना तयार केली आहे. सूक्ष्म व लघुउद्योगाला बळ मिळावे, त्यामागे हा हेतू आहे. किमान दहा सभासद यासाठी असावेत, ही अट आहे. जिल्ह्यात याअगोदर केंद्र सरकारच्या मदतीने नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर व मालेगाव येथे टेक्स्टाइल्स क्लस्टर कार्यान्वित झाले आहे. पैठणी क्लस्टरचा विषयसुद्धा प्रगतीवर आहे. त्याचप्रमाणे अनेक उद्योगांच्या क्लस्टरचे प्रपोजल उद्योग संचालनालयाच्या कार्यालयात आले आहे. त्यात चांदवडच्या भत्ता क्लस्टरचे काम वेगाने पूर्ण केले जात आहे. या क्लस्टरच्या सभासदांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी याअगोदरच त्यांना हल्दीरामच्या प्लँटला भेट देऊन माहिती देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात म्हैसूर येथे सीएफटीआरआयमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. या क्लस्टरसाठी जागाही निश्चित झाली आहे. क्लस्टरसाठी उद्योग सहसंचालक पी. पी. देशमुख, महाव्यवस्थापक पी. व्ही. रेंदाळकर व व्यवस्थापक सीमा पवार यांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत.

भेळभत्ता हा नाशिक जिल्ह्यात प्रसिद्ध आहे; पण तो सर्वत्र प्रसिद्ध व्हावा यासाठी क्लस्टर केले जाणार आहे. त्यासाठी १३१ सभासद एकत्र आले आहेत. या नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान, आधुनिक पॅकेजिंग मशिनरी, स्टीकर यांसारख्या सामूहिक गोष्टी केल्या जाणार आहेत.
- सुनिशा गिते, चेअरमन रेणुका भेळभत्ता क्लस्टर 

इतर अॅग्रो विशेष
दहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...
शेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...
कसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष? अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...
'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
पंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...
विविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
किमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...
जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।।जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।। पंढरीचा...
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी...तासगाव, जि. सांगली ः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ....
दीड हजार कोटींचा दुसरा हप्ता...मुंबई  ः गेल्या वर्षी खरीप हंगामात अपुऱ्या...
राज्यात गारठा पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह येऊ...
पंतप्रधान मोदी आज करणार महिला बचत...यवतमाळ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता...
पदव्युत्तर कृषी अभ्यासक्रमात पुढील...नागपूर ः कृषी अभ्यासक्रमात आजची परिस्थिती आणि...
दुष्काळात पीकविम्याचा आधारमुंबई ः यंदाच्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...
पाकच्या मुस्क्या आवळणार; विशेष राष्ट्र...नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ...
चीनमधील शेतीची विस्मयकारक प्रगतीविसाव्या शतकाच्या मध्यावर भारताला स्वातंत्र्य...
सेस, सेवाशुल्क आणि संभ्रमप्रक्रियायुक्त शेतमाल, फळे-भाजीपाला आणि शेवटी...
कृषी पथदर्शक राज्य साकारण्याची संधी :...पुणे : “शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक शेती तंत्र...
डिजिटल परवान्यासाठी लढा देणार : राजू...पुणे : कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाकडून...