agriculture news in marathi, Bhima Koregaon violence 14 arrested | Agrowon

कोरेगाव भिमा दंगली प्रकरणी 14 जणांना अटक
सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

पुणे : कोरेगाव भिमा व सणसवाडी (ता. शिरूर) येथे एक जानेवारीला झालेल्या दंगल तसेच वढू बुद्रुक येथे पोलिस अधिकाऱ्यांची गाडी फोडल्या प्रकरणी आता पोलीसांनी अटकसत्र सुरु केले असून, या प्रकरणी पोलीसांकडून तीन अल्पवयीन आरोपींसह अकरा जणांना अटक करण्यात आल्याची माहीती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

पुणे : कोरेगाव भिमा व सणसवाडी (ता. शिरूर) येथे एक जानेवारीला झालेल्या दंगल तसेच वढू बुद्रुक येथे पोलिस अधिकाऱ्यांची गाडी फोडल्या प्रकरणी आता पोलीसांनी अटकसत्र सुरु केले असून, या प्रकरणी पोलीसांकडून तीन अल्पवयीन आरोपींसह अकरा जणांना अटक करण्यात आल्याची माहीती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील दंगलीच्या गुन्ह्यामध्ये तसेच वढू बुद्रुक येथे पोलिस अधिकाऱ्यांची गाडी फोडल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन्ही गटाचे आरोपी असुन त्यांना कोरेगाव भीमा, सणसवाडी व कोंढापुरी येथुन अटक करण्यात आली आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार दंगल माजवणे, जाळपोळ, दगडफेक करणे तसेच सार्वजनिक व शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, पोलीसांवर हल्ला करणे आदी कलमांतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलिसांनी आरोपींची पडताळणी व खात्री करण्याचे काम सुरु केले आहे.

सध्या दंगल झालेल्या घटनास्थळावरुन ताब्यात घेतलेले सीसीटीव्ही फुटेज तपासुन आरोपींची ओळख पटविण्यात येत आहे. अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाईस सुरुवात केली आहे. पोलिसांचे एक स्वतंत्र पथक दंगल करणाऱ्या आरोपींबाबत माहीती घेत आहे. नेमण्यात आलेले हे पथक मिळालेले सर्व सीसीटीव्ही फुटेज व पुरावे तपासत आहे. कोरेगाव भीमातील या गुन्ह्याच्या तपासासाठी सुमारे चारशे पोलिसांचे बळ तैनात ठेवण्यात आलेले आहे. कोणत्याही भागामध्ये आरोपींच्या अटकेबाबत तणावाचा प्रसंग उभा राहु नये, यासाठी पोलिसांनी वतीने सर्व आरोपींच्या नावाबाबत गुप्तता बाळगली असून आरोपींची नावे गुपित ठेवण्यात आलेली असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे. 

अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने वढू बुद्रुक येथे पोलिस अधिकाऱ्यांची गाडी फोडल्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींना दहा जानेवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे तर कोरेगाव भिमा दंगल प्रकरणी अटक केलेल्या दोन आरोपींना बारा जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे तसेच अल्पवयीन असलेल्या दोन आरोपींना जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले आहे.

इतर ताज्या घडामोडी
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कृषी सल्ला : भात, भुईमुग, आंबा,...भात ः सध्या रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू...
द्राक्ष बागेत रोगांच्या प्रादुर्भावाची... सर्व द्राक्ष विभागांमध्ये...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...