agriculture news in marathi, bhimthadi jatra start at pune, maharashtra | Agrowon

भीमथडी जत्रेला उत्साहात प्रारंभ
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 डिसेंबर 2017
पुणे : ग्रामीण कला आणि खाद्यसंस्कृतीची रेलचेल असलेल्या भीमथडी जत्रेचा शुक्रवारी (ता. २२) विविध पारंपरिक वाद्यांच्या वादनाने माेठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
 
या वेळी आदिवासी नृत्य, हलगी, लेझीमवादनाने उद्‍घाटन साेहळा रंगत गेला. पुण्याच्या महापाैर मुक्ता टिळक, पाेलिस आयुक्त रश्‍मी शुक्ला, जत्रेच्या मुख्य आयाेजक सुनंदा पवार, सई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्‍घाटन साेहळा रंगला हाेता. या वेळी मान्यवरांना आदिवासी नृत्यात फेर धरण्याचा माेह आवरला नाही.
 
पुणे : ग्रामीण कला आणि खाद्यसंस्कृतीची रेलचेल असलेल्या भीमथडी जत्रेचा शुक्रवारी (ता. २२) विविध पारंपरिक वाद्यांच्या वादनाने माेठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
 
या वेळी आदिवासी नृत्य, हलगी, लेझीमवादनाने उद्‍घाटन साेहळा रंगत गेला. पुण्याच्या महापाैर मुक्ता टिळक, पाेलिस आयुक्त रश्‍मी शुक्ला, जत्रेच्या मुख्य आयाेजक सुनंदा पवार, सई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्‍घाटन साेहळा रंगला हाेता. या वेळी मान्यवरांना आदिवासी नृत्यात फेर धरण्याचा माेह आवरला नाही.
 
महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने गेली ११ वर्षे बारामती येथील अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने भीमथडी जत्रेचे आयाेजन करण्यात येत असून, यंदा जत्रेचे १२ वे वर्ष अाहे. यंदाच्या जत्रेत ३०० पेक्षा अधिक स्टॉल उभारण्यात आले असून, राज्याच्या विविध भागांतील अस्सल ग्रामीण खाद्यसंस्कृतीचा आस्वाद नागरिकांना घेता येणार आहे. 
 
यंदा  ‘विषमुक्त अन्न’ या संकल्पनेवर विशेष दालन उभारण्यात आले असून, पारंपरिक पद्धतीने काेणतीही रसायने न वापरता शेती करणारे सुमारे १०० शेतकरी आपल्या विविध उत्पादनांसह यात सहभागी झाले आहेत. तसेच जत्रेमध्ये बारा बलुतेदारांनीदेखील आपल्या पांरपारिक व्यवसायाचे सादरीकरण केले आहे. साेमवारपर्यंत (ता. २५) जत्रा सुरू असणार असल्याचे आयाेजकांच्या वतीने सांगण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...