agriculture news in marathi, Bhira recorded worlds hottest place | Agrowon

भिरा ठरले जगात सर्वांत उष्ण ठिकाण
टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 मार्च 2018

पुणे : कोकणातील भिरा येथे यंदाच्या हंगामातील ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी २९ मार्च रोजी भिरा येथे मार्च महिन्यातील सर्वकालीन उच्चांकी ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर यंदाही मार्च महिन्यात पारा पुन्हा ४५ अंशांवर पोचला असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मंगळवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भिरा जगातील सर्वात उष्ण शहर ठरले असल्याचे जागतिक हवामानाची माहिती देणाऱ्या ‘अल डोरॅडो’ या संकेतस्थळाने स्पष्ट केले आहे. 

पुणे : कोकणातील भिरा येथे यंदाच्या हंगामातील ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी २९ मार्च रोजी भिरा येथे मार्च महिन्यातील सर्वकालीन उच्चांकी ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर यंदाही मार्च महिन्यात पारा पुन्हा ४५ अंशांवर पोचला असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मंगळवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भिरा जगातील सर्वात उष्ण शहर ठरले असल्याचे जागतिक हवामानाची माहिती देणाऱ्या ‘अल डोरॅडो’ या संकेतस्थळाने स्पष्ट केले आहे. 

‘अल डोरॅडो’ या संकेतस्थळावरील नोंदीनुसार जगातील सर्वांत उष्ण पंधरा ठिकाणांमध्ये देशातील तीन ठिकाणांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील भिरा पहिल्या स्थानावर, तर गुजरातमधील पाेरबंदर (४२.५ अंश) व सुरत (४१.८) अनुक्रमे आठव्या व पंधराव्या स्थानावर आहे. या जागतिक हवामानाची माहिती देणाऱ्या या संकेतस्थळावर २४ तासांमधील जगातील उष्ण, थंड ठिकाणांसह सर्वाधिक पावसाच्या ठिकाणांचीही माहिती देण्यात येते. सध्या अंटार्टिका सर्वांत थंड ठरत असून, तेथे किमान तापमान उणे ५९.८ अंशांपर्यंत कमी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

राज्यभर उन्हाचा चटका वाढल्याने अंगाची काहिली होत आहे. मंगळवारी सकाळपर्यंत भिरापाठोपाठ मध्य महाराष्ट्रातील नगर, जळगाव, मालेगाव, मराठवाड्यातील परभणी, विदर्भातील अकोला, चंद्रपूर, वर्धा येथे तापमान ४० अंशांवर गेले आहे. भिरासह मुंबई आणि अलिबाग येथे उष्णतेची तीव्र लाट आल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. शनिवारपर्यंत (ता. ३१) राज्यात हवामान कोरडे राहणार असून, तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.   

मंगळवारी (ता. २७) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.१, नगर ४१.१, जळगाव ४०.४, कोल्हापूर ३७.२, महाबळेश्वर ३३.६, मालेगाव ४०.२, नाशिक ३८.१, सांगली ३९.२, सातारा ३८.१, सोलापूर ३९.९, मुंबई (सांताक्रूझ) ३८.७, अलिबाग ३५.५, रत्नागिरी ३४.०, डहाणू ३४.०, भिरा ४५.०, औरंगाबाद ३८.३, परभणी ४०.४, अकोला ४०.७, अमरावती ३९.८, बुलडाणा ३८.०, चंद्रपूर ४०.२, गोंदिया ३७.०, नागपूर ३९.४, वर्धा ४०.०, यवतमाळ ३९.५.

इतर अॅग्रो विशेष
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...