agriculture news in marathi, Bhira's temperature detail records will be examined | Agrowon

भिरातील उच्चांकी हवामान घटकांची चाचपणी सुरु
टीम अॅग्रोवन
रविवार, 22 एप्रिल 2018

पुणे : सर्वाधिक तापमान, पर्जन्यमानाची नोंद झाल्याने कोकणमधील रायगड जिल्ह्यातील भिरा हे गाव गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आले आहे. भिरा येथे नोंद होणारी हवामान घटकांची माहिती अचूक आहे का, याची चाचपणी हवामान विभागाकडून करण्यात येत आहे. भिरा येथे निरीक्षणे नोंदविण्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या वेधशाळेची (ऑब्जरवेटरी) जागा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वेधशाळेच्या नवीन जागेसाठी हवामान विभागाकडून सर्वेक्षणही करण्यात येत आहे. 

पुणे : सर्वाधिक तापमान, पर्जन्यमानाची नोंद झाल्याने कोकणमधील रायगड जिल्ह्यातील भिरा हे गाव गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आले आहे. भिरा येथे नोंद होणारी हवामान घटकांची माहिती अचूक आहे का, याची चाचपणी हवामान विभागाकडून करण्यात येत आहे. भिरा येथे निरीक्षणे नोंदविण्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या वेधशाळेची (ऑब्जरवेटरी) जागा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वेधशाळेच्या नवीन जागेसाठी हवामान विभागाकडून सर्वेक्षणही करण्यात येत आहे. 

कोकणातील घाटमाथ्याजवळ असलेल्या भिरा येथे अनेकदा तापमान ४५ अंशांवर जाते. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात तेथे सर्वाधिक ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तसेच पावसाळ्यात अनेक वेळा २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद होत असल्याने भिरा सर्वांच्या अौस्तुक्याचा विषय ठरले. भिरा येथे हवामान विभाग आणि टाटा पॉवर या खासगी संस्थेच्या मदतीने अंशकालीन वेधशाळा चालविण्यात येते. विदर्भापेक्षा अधिक उष्ण ठरत असल्याने भिरा येथील तापमान नोंदीवरच प्रश्‍न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर हवामान विभागाच्या पथकाने या वेधशाळेची पाहणी केली होती. वेधशाळेची जागा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सध्या भिरा येथील तापमानाच्या नोंदी घेणे बंद करण्यात आले अाहे.

हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर म्हणाले, भिरा येथे हवामान विभागाची अंशकालीन वेधशाळा आहे. त्या वेधशाळेची जागा बदलण्यात येणार असून, दुसरीकडे सर्वेक्षण करण्यात येत आहे. जागेअभावी, व्यवहारिक कारणासाठी हवामान विभागाकडून वेधशाळेच्या जागा बदलल्या जातात. त्यासाठी काही मानके निश्‍चित करण्यात आली आहेत. भिरा येथे गेल्या ५० वर्षांतील हवामान घटकांच्या नोंदी पाहिल्या तर तेथे तापमान ४० ते ४५ अंशांपर्यंत असल्याचे दिसून येते. गेल्या दोन वर्षांमध्ये याकडे जास्त लक्ष जायला लागते. 

भिरा येथील वेधशाळेची जागा बदलण्यात येणार आहे. जागा निश्‍चित करून नवीन वेधशाळा सुरू होण्यासाठी काही कालावधी जाईल. सध्या भिरा येथील वेधशाळेतून नोंदी घेणे बंद केले आहे.
- के. एस. होसाळीकर, 
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई

इतर अॅग्रो विशेष
लौटकर आऊँगा...! अटलजींना साश्रू नयनांनी...नवी दिल्ली : प्रखर देशभक्त, भारतरत्न, माजी...
धन जोप्या पाऊस, पीक मरू देईना अन्‌ वाचू...झळा दुष्काळाच्या : जि, परभणी यंदा पावसात कसा जोर...
राज्यात सर्वदूर पाऊसपुणे ः राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (...
बेबाकी प्रमाणपत्राशिवाय राष्ट्रीय...मुंबई: पाऊस न पडल्याने आधीच त्रस्त असलेल्या...
मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर सर्वदूर पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर...
अजातशत्रूदेशाच्या राजकारणात आपल्या शालीन, सभ्य राजकारणाने...
बोंड अळी नियंत्रणासाठी...पुणे : राज्यात कपाशीतील बोंड अळीचे संकट वाढण्याची...
‘अटलपर्वा’चा अस्तनवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...
शेततळी झाली, शेती बागायती झालीसध्या राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
मध्यस्थविरहीत विक्री व्यवस्था उभी...अकोला येथे कार्यरत असलेल्या स्नातकोत्तर पशुवैद्यक...
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी कालवशनवी दिल्ली : प्रखर देशभक्त, भारतरत्न, माजी...
अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनकनवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून एम्स...
देशाचा विकास वेगाने होतोय : राष्ट्रपतीनवी दिल्ली : ''देशातील परिस्थिती झपाट्याने...
स्वातंत्र्य संग्रामातील ग्रामीण सहभागब्रिटिश सत्तेविरोधी स्वातंत्र्य चळवळीत केवळ शहरी...
सापळ्यात अडकलाय शेतकरीयावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात बीटी कापसावर एक...
नाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...
पुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...
राज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...
शेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...
इथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...