agriculture news in marathi, Bhutan strives to achieve vegetable self-sufficiency | Agrowon

भाजीपाल्यामध्ये स्वयंपूर्णता गाठण्यासाठी भूतानचे प्रयत्न
वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

भूतान हा देश संपूर्ण सेंद्रिय उत्पादनासाठी ओळखला जात असला तरी भाजीपाल्यासाठी या देशांला काही प्रमाणात आयातीवर अवलंबून राहावे लागते. हे अवलंबित्व कमी करण्यासाठी भूतान शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत.

भूतान हा देश संपूर्ण सेंद्रिय उत्पादनासाठी ओळखला जात असला तरी भाजीपाल्यासाठी या देशांला काही प्रमाणात आयातीवर अवलंबून राहावे लागते. हे अवलंबित्व कमी करण्यासाठी भूतान शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत.

भाजीपाला उत्पादनामध्ये स्वयंपूर्णता आणण्यासाठी १२ व्या नियोजनाच्या अंती देशामध्ये किमान ६५१६२ टन भाजीपाल्याचे उत्पादन होण्याची गरज आहे. २०१४, २०१५ आणि २०१६ या तीन वर्षांमध्ये सरासरी ५९५८ टन भाजीपाल्याची निर्यात झाली असली तरी आयातीचे प्रमाणे १४,३५४ टनापर्यंत पोचले होते. एकूण स्थितीविषयी माहिती देताना राष्ट्रीय भाजीपाला समन्वयक किन्ले टशेरींस म्हणाले की, ११ व्या नियोजनाच्या सुरवातील भाजीपाल्यातील स्वयंपूर्णता ही ८३.१२ टक्के इतकी होती. ती वाढून आता ८६.१३ टक्के झाली आहे. १२ नियोजनाच्या अंतिम टप्प्यापर्यंत ही टक्केवारी १०० टक्क्यांपर्यंत नेण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. म्हणजेच भाजीपाला उत्पादन सध्याच्या ५२११४ टनांपासून वाढून ६५१६२ टनांपर्यंत पोचण्याची आवश्यकता आहे.
११ व्या नियोजनाच्या सुरवातीला देशाची भाजीपाला निर्यात २७२१ टन (किंमत ६३० युरो) होती. ती वाढून २०१६ मध्ये ८२४२ टन (किंमत २०.४ लाख युरो) पर्यंत पोचली. सांख्यिकी भाषेमध्ये ही निर्यातीतील वाढ सुमारे ८८ टक्के होते. सध्या भारतातून आयात होत असलेल्या भाज्यामध्ये टोमॅटो आणि कांदा मुख्य आहेत.
भूतान येथील कृषी मंत्रालयामार्फत भूतान येथील सर्व जिल्ह्यामध्ये भाजीपाला उत्पादनासाठी लक्ष्य ठरवून देण्यात आले आहे. लोकांना त्यांच्या पारंपरिक पिकाकडून भाजीपाला उत्पादनाकडे वळविण्यात येत आहे. त्यासाठी गेल्या ऑगस्टपासून भुतानच्या दक्षिणेकडील आठ जिल्ह्यांमध्ये अधिक प्रयत्न केले जात आहेत.

या भाज्यांना प्राधान्य ः
११ व्या नियोजनामध्ये टर्निप्स (लाल मुळा), ब्रोकोली, वांगी, लसूण, कांदा पात, टोमॅटो, मिरची, काकडी, भोपळा, गाजरे या भाज्यांना प्राधान्य दिले होते. पुढे १२ व्या नियोजनामध्ये यात भेंडी आणि स्कॅश यांची भर पडली.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...