agriculture news in Marathi, bibbe at 8000 to 10000 rupees in Aurangabad, Maharashtra | Agrowon

औरंगाबादेत बीबे प्रतिक्विंटल ८००० ते १०००० रुपये
टीम अॅग्रोवन
रविवार, 7 जानेवारी 2018

औरंगाबाद ः मकर संक्रांतीच्या निमित्ताने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ६) वाणासाठी आवश्‍यक बीब्यांची १२ क्‍विंटल आवक झाली. या बीब्याला प्रतिक्‍विंटल ८००० ते १०००० रुपयांचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद ः मकर संक्रांतीच्या निमित्ताने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ६) वाणासाठी आवश्‍यक बीब्यांची १२ क्‍विंटल आवक झाली. या बीब्याला प्रतिक्‍विंटल ८००० ते १०००० रुपयांचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची २३ क्‍विंटल आवक झाली. या मिरचीचे दर २५०० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ४१४ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला १२०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २०१ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर ३०० ते ५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. वांग्याची आवक ५३ क्‍विंटल तर दर ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. भेंडीची आवक ११ क्‍विंटल तर दर २५०० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २३ क्‍विंटल आवक झालेल्या मकाला १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

काकडीची आवक ४३  क्‍विंटल तर दर ६०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १७ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबाला ५०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. दुधी भोपळ्याची आवक ९ क्‍विंटल तर दर ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १६५ क्‍विंटल आवक झालेल्या पत्ता कोबीला ७०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. फ्लाॅवरची आवक ३५ क्‍विंटल तर दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३३ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळी मिरचीला २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

वाटाण्याची आवक ७७  क्‍विंटल तर दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३५ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीला २०० ते २५०  रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. १५ हजार जुड्यांची आवक झालेल्या पालकचे दर १०० ते २०० रुपये प्रतिशेकडा राहिला. तर ४२ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीला १०० ते २५० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १०६ टीएमसी...पुणे  : जिल्ह्यातील पश्‍चिम भागात असलेल्या...
बुलडाणा, वाशीममध्ये दूध दरप्रश्‍नी...अकोला  ः दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दर...
पोषक घटकांनीयुक्त शेळीचे दूधभारतामध्ये प्रामुख्याने गायीच्या व म्हशीच्या...
मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही दूध...औरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या गेलेल्या...
कोल्हापुरात हिंसक वळणकोल्हापूर : दूध आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी...
चंद्रकांतदादांच्या आश्वासनानंतर उपोषण...परभणी  ः पीकविमा परताव्यापासून वंचित...
शेतकऱ्यांना बोंड अळीची नुकसानभरपाई...नाशिक  : गेल्या वर्षी बोंड अळीमुळे कापूस...
खानदेशात ८० टक्के पेरणी उरकलीजळगाव : खानदेशात जवळपास ८० टक्के क्षेत्रावर पेरणी...
हाँगकाँग येथे जांभळ्या रताळ्यापासून...हाँगकाँग येथील एका खासगी साखळी हॉटेल उद्योगाने...
फ्लाय अॅशपासून कॉंक्रिटची निर्मिती शक्यसध्या टाकाऊ समजल्या जाणाऱ्या फ्लाय ॲशपासून अधिक...