agriculture news in marathi, big drought in Yeola taluka | Agrowon

येवला तालुक्यात दुष्काळाच्या तीव्र झळा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 मार्च 2019

शासनाने येवला तालुक्यातील काही गावे दुष्काळी म्हणून घोषित केले. मात्र अद्याप या गावांना दुष्काळाच्या कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. शासनाने तात्काळ दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना करण्यात.
- भागवतराव सोनवणे, संयोजक, जलहक्क संघर्ष समिती.

पावसाच्या भरवश्यावर पिके घेतली. मात्र पाण्याअभावी ती जळून गेली. पाण्याचा प्रश्न अडचणींचा आहे. त्यासोबत कुठलाही रोजगार नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

- नारायण पवार, कुसमाडी, ता.येवला

येवला तालुक्यातील पूर्व- उत्तर भागात पाण्याची टंचाई आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यातील नागरिकांना पाणी कसे उपलब्ध करून देता, येईल यावर काम सुरू आहे. पालखेडच्या अवर्तनामुळे टंचाई निवाररण्यास हातभार लागेल.
- अन्सार शेख, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, येवला. 

नाशिक : या वर्षीच्या कमी पावसामुळे येवला तालुका दुष्काळाच्या झळांनी बेजार आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा पार करताना मोठी कसरत करावी लागत आहे. पाऊस न पडल्यामुळे नदी, नाले, साठवण बंधारे कोरडे पडले आहेत. पिकांसाठी पाणी उपलब्ध नसल्याने खरीप व रब्बी हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी, नागरिक चिंतेत आहेत.

पावसाचे प्रमाण कमी असताना तालुक्यातील शेतकऱ्यांनी थोड्या पाण्यात कांदा उत्पादन घेतले. पिकासाठी खर्च करूनही तो वसूल झाला नाही. विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठला आहे. अगदी सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भभला. शेती ओस पडल्याने त्यावर अवलंबून राहणाऱ्या मजुरांच्या हाताना काम नाही. रोजगाराअभावी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

मागील वर्षांपासून तालुक्यातील १४ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. उत्तर-पूर्व भागात मोठी दुष्काळी परिस्थिती आहे. माणसांबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच चाऱ्याच्या प्रश्न आहे. यासाठी साठवलेला चाराही संपत आला आहे. जनावरे जागविण्याचा मोठा प्रश्न आहे.

येवला तालुक्यातील ६ मंडलांपैकी ५ मंडले दुष्काळी म्हणून जाहीर केली आहेत. तालुक्यातील सर्वच स्रोत आटल्यामुळे शासकीय यंत्रणेद्वारे ५० गावे व जवळपास ३० वाड्या, वस्त्यांना २९ टँकरद्वारे पिण्याचे पाणीपुरवठा केला जात आहे.

पाण्याचा टँकर आल्यानंतर नागरिकांची मोठी झुंबड उडत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील पश्चिम भागात ३८ गावे पाणीपुरवठा योजनेद्वारे ५७ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.

इतर बातम्या
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
स्टार्च शिजवण्यासह खाण्याचे पहिले...दक्षिण आफ्रिकेतील क्लासीज नदी परिसरातील...
पुणे विभागात तब्बल ९५७ टॅंकरव्दारे...पुणे  : उन्हाचा वाढलेला चटका, भूजलपातळीत...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
‘एफआरपी'साठी शेतकरी संघटना पुन्हा...सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या...
भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसन...पुणे : भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसनाची...
राज्यात आता पीकविमा शेतकरी सहभाग अभियानपुणे: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी यंदा...