agriculture news in marathi, big response for agrowon agri expo,nagar, maharashtra | Agrowon

अॅग्रोवन कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
टीम अॅग्रोवन
रविवार, 25 फेब्रुवारी 2018
नगर ः येथे सुरू असलेल्या ‘सकाळ - अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनास दोन दिवसांपासून नगर जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यामंधील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी (ता. २४ ) सकाळपासून शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी तसेच शेतीउपयोगी माहिती मिळविण्यासाठी गर्दी केली होती.  
 
नगर ः येथे सुरू असलेल्या ‘सकाळ - अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनास दोन दिवसांपासून नगर जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यामंधील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी (ता. २४ ) सकाळपासून शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी तसेच शेतीउपयोगी माहिती मिळविण्यासाठी गर्दी केली होती.  
 
नगरमधील सावेडीतील जागिंग पार्क मैदानावर शुक्रवारपासून (ता. २३) तीन दिवसीय ‘सकाळ - अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनास प्रारंभ झाला आहे. प्रदर्शनात शेतीविषयक अत्याधुनिक माहिती देणारे शेतीची अवजारे, गटशेती, सेंद्रिय शेती, विषमुक्त भाजीपाला, ट्रॅक्‍टर, सोलर यांसह विविध खते आणि बियाण्यांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत.
 
या कृषी प्रदर्शनाला नगर शहर व जिल्ह्यासह शेजारच्या औरंगाबाद, बीड, सोलापूर, पुणे आदी भागांतून शेतकरी येत आहेत. शेतीकामात बैलांना पर्याय, मजूरटंचाईवर उपाय म्हणून आंतरमशागतीसाठी छोटे ट्रॅक्‍टर कसे उपयुक्त आहे याचे प्रात्यक्षिकासह मांडणी येथे करण्यात आली आहे. त्याचबरोबर आधुनिक व व्यावसायिक शेळीपालन तर निर्यातक्षम डाळिंब उत्पादन व उसाचे दीडशे टन एकरी किफायशीर उत्पादन तंत्र या विषयावर चर्चासत्रे झाली. त्यास देखील शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. 

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...