बिहारकडून ८० अब्ज पूरग्रस्त निधीची मागणी
कोजेन्सिस वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली ः बिहारमध्ये येऊन गेलेल्या महापुराने ८ लाख १० हजार, ४५३ हेक्टरवरील खरीप पिकाचे नुकसान झाले अाहे. त्यासाठी राज्याला ८० अब्ज रुपयांचा निधी देण्याची मागणी बिहार सरकारने केंद्राकडे केली अाहे, अशी माहिती सूत्रांनी दिली अाहे.

राज्यातील ४.५ दशलक्ष हेक्टरवर पीकक्षेत्र अाहे. गेल्या जुलै-अाॅगस्टदरम्यान अालेल्या पुरामुळे १९ जिल्ह्यांना फटका बसला अाहे. पुराशी संबंधित ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला अाहे. तर भात, मका अाणि ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले अाहे. भात अाणि मका उत्पादनात बिहार देशात अाघाडीवर अाहे.

नवी दिल्ली ः बिहारमध्ये येऊन गेलेल्या महापुराने ८ लाख १० हजार, ४५३ हेक्टरवरील खरीप पिकाचे नुकसान झाले अाहे. त्यासाठी राज्याला ८० अब्ज रुपयांचा निधी देण्याची मागणी बिहार सरकारने केंद्राकडे केली अाहे, अशी माहिती सूत्रांनी दिली अाहे.

राज्यातील ४.५ दशलक्ष हेक्टरवर पीकक्षेत्र अाहे. गेल्या जुलै-अाॅगस्टदरम्यान अालेल्या पुरामुळे १९ जिल्ह्यांना फटका बसला अाहे. पुराशी संबंधित ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला अाहे. तर भात, मका अाणि ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले अाहे. भात अाणि मका उत्पादनात बिहार देशात अाघाडीवर अाहे.

कृषी मंत्रालयाच्या अाकडेवारीनुसार, राज्यातील मका पीकक्षेत्र ५.३ टक्क्यांनी कमी झाले अाहे. तर ऊस पीकक्षेत्र ४.३ टक्क्यांनी वाढून २ लाख ४० हजार हेक्टरवर पोचले अाहे. राज्यात ३.४२ दशलक्ष हेक्टरवर भातपीकक्षेत्र व्यापले अाहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भात पीकक्षेत्रात साडेचार टक्क्यांनी वाढ झाली अाहे. मात्र, पुराने भातासह मका, ऊसपिकाचे नुकसान झाले अाहे.

ऊसपिकाच्या नुकसानामुळे साखर उतारा कमी मिळण्याची शक्यता अाहे. तसेच दरवर्षी राज्यातील गाळप हंगाम नोव्हेंबरच्या सुरवातीला सुरू होताे. मात्र, यंदा नुकसानामुळे गाळप हंगाम सुरू होण्यास उशीर होणार असल्याचे चित्र दिसत अाहे.

छत्तीसगडमध्ये दुष्काळस्थिती; ५० अब्ज निधीची मागणी

छत्तीसगडमध्ये अाॅगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाने ओढ दिल्याने दुष्काळस्थिती निर्माण झाली अाहे. या पार्श्वभूमीवर छत्तीसगड सरकारने केंद्राकडे ५० अब्ज रुपये दुष्काळनिधीची मागणी केली अाहे. राज्यातील २७ जिल्ह्यांपैकी २१ जिल्हे दुष्काळ प्रभावित अाहेत. दुष्काळामुळे राज्यातील अर्ध्याहून अधिक खरीप पीकक्षेत्राला फटका बसला अाहे, असे राज्यातील कृषी मंत्रालयातील सूत्रांनी म्हटले अाहे.

राज्यात मॉन्सूनच्या सुरवातीला चांगला पाऊस झाला. त्यानंतर अाॅगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाने ओढ दिली. यामुळे भात, सोयाबीन, कडधान्ये पिकांचे नुकसान झाले अाहे. राज्यात ३.७ दशलक्ष हेक्टरवर भातपीकक्षेत्र अाहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भातपीकक्षेत्रात वाढ झाली अाहे. मात्र, कमी पावसाचा फटका पिकाला बसला अाहे. राज्यातील दुष्काळस्थितीवर राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना करून शेतकऱ्यांना मदत केली जात असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात अाले अाहे.

इतर ताज्या घडामोडी
संत गजानन महाराज संस्थान करतेय...शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज...
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी...मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या...
औरंगाबादेत २९ ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे...
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...
परभणीत प्रतिक्विंटल टोमॅटो १२०० ते १८००...परभणी ः येथील कृषी उत्पन्न बाजार...
आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी...पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या...
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के...परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...
वाटाणा लागवड कधी करावी?वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगल्या...
नागपूर ३६.४ अंशांवरपुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ...
कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर वधारलेकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
जळगावात उडदाची आवक घटलीजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात...
नाशिकला टोमॅटोची आवक निम्म्याने घटलीनाशिक : नाशिक जिल्ह्यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या...
उत्पादकता घटल्याने फूल मार्केटमध्ये...नागपूर : परतीच्या पावसाचा फटका बसल्याने या वर्षी...
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...