agriculture news in Marathi, bio manure sell on name of agri university, Maharashtra | Agrowon

कृषी विद्यापीठाच्या नावावर जैविक खतांची विक्री
टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लुटीची माहिती आहे. जैविक खतांच्या विक्रीसाठी हा प्रकार होत आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नावाचा वापर होत असल्याने शेतकऱ्यांनी सावध राहावे. अशा प्रकारच्या कोणत्याही खतांची विक्री विद्यापीठ करीत नसून ‘आमची माती आमची माणसं’ अशी कोणती योजनादेखील नाही. हे भामटे आढळल्यास ९४०३६१७११३ या क्रमांकावर संपर्क साधावा.
- डॉ. उषा डोंगरवार, कार्यक्रम समन्वयक, केव्हीके भंडारा

भंडारा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून आल्याची बतावणी करीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांचे जैविक खत देत गंडविण्याचे प्रकार जिल्ह्यात वाढीस लागले आहेत. अनेक शेतकऱ्यांना या माध्यमातून गंडा घातल्याची माहिती असून शेतकऱ्यांनी अशा प्रकारांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

भंडारा जिल्ह्याच्या काही भागात ऊस लागवड होते. या शेतकऱ्यांपर्यंत जात दोन अनोळखी इसमांनी त्यांना फसविले आहे. त्याकरीता अकोला मुख्यालय असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नावाचा आधार हे भामटे घेत असल्याची माहिती आहे.

कृषी विद्यापीठाद्वारे ‘‘आमची माती आमची माणसं’’ हा कार्यक्रम राबविला जात आहे. त्याअंतर्गत तीन शेतकऱ्यांची निवड करून त्यांना जैविक खत मोफत दिली जातात. याच शेतकऱ्यांना पुढे पाच एकर क्षेत्राकरीता ठिबक संच, बियाणे व मोफत खते देखील दिली जाणार असल्याचे सांगितले जाते. ही माहिती इतर शेतकऱ्यांना सांगू नका तसे झाल्यास शेतकऱ्यांची संख्या वाढेल आणि मग वाद होतील; असे सांगून फक्‍त तुमचीच निवड करायची असल्यास दहा हजार रुपयांची मागणी हे भामटे करतात, अशी माहिती आहे.

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...