agriculture news in Marathi, Biocapsul will supply by agri industry corporation, Maharashtra | Agrowon

कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा पुरवठा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 एप्रिल 2019

पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य कृषिउद्योग महामंडळाने आता ‘बायोकॅप्सूल’ नावाने जैविक खताचा पुरवठा सुरू केला आहे.

“एका कॅप्सूलमध्ये सुमारे एक लाख कोटी जिवाणू आहेत. त्यामुळे द्विदल किंवा एकदल वर्गीय पिकांसाठी नत्राचा पुरवठा वाढणार आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) पेटंट असलेल्या या रायझो कॅप्सूल, अझोकॅप्सूलची किंमत ३५० रुपये ठेवण्यात आली आहे. बायोकॅप्सूलचा वापर राज्याच्या सेंद्रिय व जैविक शेतीच्या वाटचालीत महत्त्वाचा टप्पा आहे,’’ अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापक दीपक पाटील यांनी दिली. 

पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य कृषिउद्योग महामंडळाने आता ‘बायोकॅप्सूल’ नावाने जैविक खताचा पुरवठा सुरू केला आहे.

“एका कॅप्सूलमध्ये सुमारे एक लाख कोटी जिवाणू आहेत. त्यामुळे द्विदल किंवा एकदल वर्गीय पिकांसाठी नत्राचा पुरवठा वाढणार आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) पेटंट असलेल्या या रायझो कॅप्सूल, अझोकॅप्सूलची किंमत ३५० रुपये ठेवण्यात आली आहे. बायोकॅप्सूलचा वापर राज्याच्या सेंद्रिय व जैविक शेतीच्या वाटचालीत महत्त्वाचा टप्पा आहे,’’ अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापक दीपक पाटील यांनी दिली. 

सेंद्रिय पदार्थांच्या जलद विघटनासाठी सूक्ष्म मूलद्रव्ये उपयुक्त ठरतात. ती पिकाला उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढविणे महत्त्वाचे असते. महामंडळाने एकूण आठ प्रकारच्या बायोकॅप्सूल शेतकऱ्यांना पुरवठा सुरू केला आहे. त्यात स्फुरदाचा सर्व पिकांसाठी पुरवठा होण्याकरिता पीएसबी प्लस कॅप्सूल तर नत्र, स्फुरद, पालाशचा सर्व पिकांच्या वापराकरिता एनपीके कॅप्सूल आणले गेले आहे.

महामंडळाचे महाव्यवस्थापक महेंद्र बोरसे यांच्या म्हणण्यानुसार “राज्य शासनाच्या अखत्यारित काम करणाऱ्या कृषी उद्योग महामंडळाने बायोकॅप्सूल तयार करण्यासाठी नॅनो टेक्नॉलॉजीचा आधार घेतला आहे. सेंद्रिय आणि रासायनिक अशा दोन्ही वर्गातील शेतीसाठी बायोकॅप्सूल उपयुक्त ठरतील. महत्त्वाचा भाग म्हणजे जिवाणूच्या सध्याच्या वापरासाठी होणारा खर्च कमी होणार आहे. बायोकॅप्सूलच्या माध्यमातून साडेतीनशे रुपयात एक लाख कोटी जिवाणू हमखास उपलब्ध होऊ शकतील.’’ 

...असा होतो वापर
एक बायोकॅप्सूल पाच लिटर पाण्यात भिजवून ठेवल्यास पेरणीपूर्वी त्यातील एक लिटर पाण्यात बियाणे भिजवून ठेवता येते. उर्वरित चार लिटर पाणी फवारणीसाठी किंवा इतर पिकांच्या मुळाशी वापरता येते. फवारणीसाठी स्फ्रिंकलर अथवा ठिबकद्वारे देखील जिवाणू सोडता येतात. “महामंडळाने या तंत्रज्ञानासाठी छत्तिसगडच्या एसआरटी सायन्स या संस्थेची मदत घेतली आहे. पुणे भागातील काही शेतकऱ्यांना या कॅप्सूलच्या वापराबाबत चांगले निष्कर्ष हाती आले आहेत,’’ असे महामंडळाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

इतर अॅग्रो विशेष
उद्योगाला साखर कडूचमहाराष्ट्रातील गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली...
‘एफआरपी'साठी शेतकरी संघटना पुन्हा...सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या...
विदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली २३...वर्धा जिल्ह्यात केळी पिकाला पुन्हा गतवैभव प्राप्त...
भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसन...पुणे : भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसनाची...
वर्षभरात पाच हंगामात दर्जेदार कोथिंबीरपाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे...
राज्यात आता पीकविमा शेतकरी सहभाग अभियानपुणे: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी यंदा...
छावण्यातील जनावरांची आठवड्यातून एकदा...मुंबई ः दुष्काळी भागातील चारा छावण्यांमधील...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला मागणीकोल्हापूर: निर्यातीच्या बाबतीत पिछाडलेल्या...
शुक्रवारपर्यंत उष्ण लाटेचा इशारापुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने चटका असह्य...
आखातात १८ हजार टन केळी निर्यातजळगाव ः मागील दोन महिन्यांत राज्यातून प्रतिदिन १५...
मॉन्सून एक्सप्रेसची गती मंदावली;...पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (...
कृषी विभागाच्या बदल्या यंदाही...पुणे : कृषी विभागातील बदल्यांचा घोडेबाजार...
एकनाथ डवलेंकडे कृषी सचिवपदाचा पूर्णवेळ...मुंबई : मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले...
परभणी : दुष्काळाच्या फेऱ्यात फळबागा...परभणी ः जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढल्यामुळे...
पूरक धोरणानेच वाढेल निर्यातकें द्रातील मोदी सरकारच्या सुरवातीच्या काळात...
निवडणूक आयोगाला घरचा आहेर! सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदान प्रक्रिया कालच...
विरोधी पक्षनेता आज ठरणार; पृथ्वीराज...नागपूर ः राधाकृष्ण विखे पाटील यांच्या...
कृषी निविष्ठांमध्ये हवी मधमाशीपुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या...
विषबाधा नियंत्रणाची जबाबदारी आता...यवतमाळ : जिल्ह्यात फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधा...
उन्हाचा चटका अन् उकाड्यातही वाढपुणे : विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरीसह मध्य...