agriculture news in marathi, biofuel-will-be-feature-india-dharmendra-pradhan | Agrowon

जैवइंधनातून नवीन अर्थनीती निर्माण होणार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 नोव्हेंबर 2017

पुणे : इथेनॉलचा वापर आणि जैवइंधनाच्या क्रांतीतून नवीन अर्थनीती पुढील चार-पाच वर्षांत निर्माण हाेणार आहे. इथेनॉलवापराबाबत केंद्र सरकार गंभीर आहे. यासाठी केंद्र शासन लवकरच शाश्‍वत धाेरण जाहीर करणार आहे. या धाेरणामध्ये आजच्या राष्ट्रीय परिषदेमधील विविध तज्ज्ञांच्या सूचनांचा अंतर्भाव करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय पेट्राेलियम आणि नैसर्गिक वायुमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी (ता. २४) केले.   

पुणे : इथेनॉलचा वापर आणि जैवइंधनाच्या क्रांतीतून नवीन अर्थनीती पुढील चार-पाच वर्षांत निर्माण हाेणार आहे. इथेनॉलवापराबाबत केंद्र सरकार गंभीर आहे. यासाठी केंद्र शासन लवकरच शाश्‍वत धाेरण जाहीर करणार आहे. या धाेरणामध्ये आजच्या राष्ट्रीय परिषदेमधील विविध तज्ज्ञांच्या सूचनांचा अंतर्भाव करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय पेट्राेलियम आणि नैसर्गिक वायुमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी (ता. २४) केले.   

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था (सीआयआरटी) आणि इंडियन फेडरेशन आॅफ ग्रीन एनर्जी यांच्या वतीने आयाेजित ‘वाहतुकीसाठी इथेनॉल‘ या राष्‍ट्रीय परिषदेचे उद्घाटन मंत्री प्रधान यांच्या हस्ते झाले. या वेळी परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी, राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख, अन्न पुरवठामंत्री गिरीश बापट, माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब एम.के. पाटील आदी मान्यवर उपस्थित हाेते. 

मंत्री प्रधान म्हणाले, ‘‘भविष्यात इथेनाॅलशिवाय पयार्य राहणार नसल्याने केंद्र सरकार इथेनॉलबाबत गंभीर अाहे. २०३० मध्ये ५ हजार काेटी लिटर इथेनाॅलची गरज भासणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढीबराेबरच ग्रामीण भागात ५० लाख राेजगारनिर्मितीची संधी इथेनॉलमध्ये आहे. यासाठी पुढील चार-पाच वर्षांत इथेनाॅल क्रांती हाेणार आहे. यासाठी केंद्र सरकार सेकंड जनरेशन इथेनॉलसाठी शाश्‍वत धाेरण आणणार आहे. केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षांत ६ हजार काेटींचे करार केले असून, आगामी दाेन वर्षांत ५० हजार काेटींचे करार सरकार करणार आहे. साखर उद्याेगांना चांगले दिवस येण्यासाठी ७० वर्षांचा कालावधी लागला. मात्र जैवइंधन, इथेनॉल, मिथेन आदि क्षेत्रात येत्या पाच वर्षांत क्रांती हाेणार आहे. यामुळे राज्यातील साखर कारखान्यांनी स्वतःपुरता विचार न करता, इथेनॉलनिर्मितीकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे.‘‘

मंत्री गडकरी म्हणाले, की इंधनावरील ७ लाख काेटींचे आयात शुल्क ही आर्थिक व्यवस्थेची आणि इंधनाचा वापर ही वायुप्रदूषण समस्या बनली आहे. तसेच तेलबीया आणि डाळींचे दरदेखील आधारभूत किमतीच्या खाली आले आहेत. कृषी क्षेत्रापुढील ही माेठी समस्या बनली आहे. या विविध समस्यांवर मात करण्यासाठी भात, गहू, कापूस आणि तुरीच्या तुराट्यांपासून जैवइंधननिर्मितीतून ग्रामीण भागात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ५० लाख राेजगारनिर्मिती हाेणार आहे. यासाठी भविष्यात एक हजार उद्याेग उभारण्याचे सरकारचे धाेरण आहे. देशात सुमारे ५०० साखर कारखाने असून यामधून बगॅजपासून मूल्यवर्धनातून बायाे फर्टिलाजर्स बनवू शकतात. तसेच बांबूपासूनदेखील जैवइंधननिर्मिती शक्य अाहे. यासाठी उसाच्या दरात बांबू खरेदी करणार आहे. यामुळे १२ महिने कारखाने सुरू राहणार आहेत.

नदीजाेड प्रकल्पामुळे देशात सिंचन क्षेत्रात ४० टक्क्यांनी वाढ हाेणार असून, शेतीची उत्पादकता अडीच पटींनी वाढणार आहे. परिणामी शेतीमधील कचरादेखील माेठ्या प्रमाणावर तयार हाेणार आहे. या कचऱ्यावर इंधननिर्मितीच्या प्रकल्पांसाठी  बायाेमास कलेक्शन हे राेजगाराचे साधन बनणार असून, दहा दहा किलाेमीटरच्या परिघामध्ये बाेयामास संकलन केंद्रे उभारण्यात येणार आहे. परदेशात अशी केंद्रे उभारण्यात आली आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागात राेजगार संधी उपलब्ध हाेणार आहे. यामुळे इथेनॉलनिर्मितीमध्ये माेठ्या संधी असून, यासाठी पेट्रीलिनयम मंत्रालयाने शाश्‍वत धाेरण आणणे गरजेचे आहे. या धाेरणातून पुढील १० वर्षांचे इथेनॉल आणि ऊर्जा खरेदीचे करार करणे गरजेचे आहे, असेही गडकरी या वेळी म्हणाले. 

आण्णासाहेब एम. के. पाटील यांनी मनाेगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र सानेर पाटील यांनी केले, तर आभार विद्या मुरकुंबी यांना मानले. 

इतर अॅग्रो विशेष
जागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...
पाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...
विदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...
मराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...
खानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...
'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...
साखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...
कापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...
कृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...
धुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
दुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...
आणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...
मेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...
सिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...
पीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...
आपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...
अन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...
पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...
फुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...
कोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...